NANDURBAR : पोल्ट्री व्यवसाय अडचणीत, सहा महिन्यांपासून अंड्याचे दर कमी, उत्पादन खर्चही निघत नसल्याची उद्योजकांची व्यथा

NANDURBAR : पोल्ट्री व्यवसाय अडचणीत, सहा महिन्यांपासून अंड्याचे दर कमी, उत्पादन खर्चही निघत नसल्याची उद्योजकांची व्यथा
पोल्ट्री व्यवसाय अडचणीत
Image Credit source: tv9 marathi

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झाल्याचे दिसून येते वाहतुकीचे दर वाढले आहेत. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना त्याचे दर वाढले असल्याने व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे असंही आरिफभाई यांनी सांगितलं.

जितेंद्र बैसाणे

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 29, 2022 | 2:39 PM

नंदूरबार : उत्तर महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात मोठा पोल्ट्री हब (Poultry Hub) म्हणून ओळख असलेल्या नवापूरचा (Navapur) पोल्ट्री उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. त्यामागील कारणंही तसंच आहे, पोल्ट्री फीड म्हणून ओळख असलेल्या कोंबड्यांच्या खाद्याचा दर वाढला आहे. त्या तुलनेने अंड्यांचे दर वाढत नसल्याने व्यवसाय तोट्यात जाऊन बंद पडण्याची भीती पोल्ट्री उद्योजकांना वाटत आहे. कोंबड्यासाठी तयार होत असलेलं खाद्य अधिक महागलं आहे. त्यामुळे एका कोंबडीतून मिळणार उत्पन्न हे सगळं कोंबडीच्या खाद्यावर खर्च होत आहे. मागील चार महिन्यांपासून हे सुरू असल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे.

गेल्या 6 महिन्यापासून अंड्याच्या दर चार रुपयापेक्षा कमी

वाढत्या महागाईचा फटका जसा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्या पद्धतीने पोल्ट्री व्यवसायिकांना ही फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवापूर मधील पोल्ट्री हबमध्ये कोंबड्यांसाठी खाद्य ही तयार केले जाते. त्यासाठी लागणारा मका इतर कडधान्य ढेप तसेच इतर पदार्थांचा दर महागला आहे. त्यामुळे कोंबड्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या खाद्याच्या किमतीत जवळ पास 20 टक्के वाढ झाली आहे. एका अंड्यासाठी कोंबडीवर होणारा खर्च जवळपास 4 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्यापासून अंड्याच्या दर चार रुपयापेक्षा कमी असल्याने पोल्ट्री उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे अशी माहिती अध्यक्ष नवापूर पोल्ट्री उत्पादक असोशियन आरिफभाई यांनी सांगितली.

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झाल्याचे दिसून येते वाहतुकीचे दर वाढले आहेत. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना त्याचे दर वाढले असल्याने व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे असंही आरिफभाई यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारने पोल्ट्री व्यवसायिक यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

परिस्थिती अशीच राहिली तर देशातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात येण्याचे संकेत असल्याचे चित्र आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें