वाळू तस्करांची हिम्मत वाढली, नायब तहसीलदार-तलाठ्यावर चाकू हल्ला

वाळू तस्करांनी नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केलं.

  • विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 11:55 AM, 24 Jan 2021
वाळू तस्करांची हिम्मत वाढली, नायब तहसीलदार-तलाठ्यावर चाकू हल्ला

यवतमाळ :  यवतमाळच्या वाळू तस्करांची चांगलीच हिम्मत वाढलीय. जनतेच्या भल्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केलाय. तहसीलदार आणि तलाठ्यांवर वाळूची तस्करी करणाऱ्या गुंडांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. (The sand smugglers attacked Deputy Tehsildar Vaibhav Pawar)

उमरखेड शहरातील ढाणकी रोडवरील गो. सी. गावंडे कॉलेजजवळ उमरखेड तहसिल चे नायब तहसिलदार वैभव विठ्ठल पवार आणि तलाठी गजानन विठ्ठल सुरोशे यांच्यावर अज्ञात रेती तस्करांनी हल्ला केलाय. या हल्यात नायब तहसीलदार वैभव पवार यांना पोटावर चाकूचे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. तर तलाठी गजानन सुरोसे यांनाही दुखापत झाली आहे.

वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने नायब तहसीलदार वैभव पवार यांना तात्काळ शासकीय रुग्णालय उमरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवलं आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली असून आरोपी अविनाश चव्हाण व त्यांच्या इतर साथीदारांवर कडक कलम लावून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश SDPO SDO यांना दिले आहे. तसेच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती ठीक असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

नायब तहसिलदार पवार यांच्यावर भगवती रुग्णालय नांदेड येथे सध्या उपचार सुरु आहेत. तर हा हल्ला नेमका कुणी केला, कशासाठी केला?, याचा शोध पोलीस घेत आहेत. (The sand smugglers attacked Deputy Tehsildar Vaibhav Pawar)

हे ही वाचा

रेतीतस्करांचा कहर, गळा चिरत शेतकऱ्याला संपवले

लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ

दुसरीही मुलगी झाली म्हणून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, डॉक्टर पती फरार, पोलीस कन्येची हादरुण सोडणारी बातमी