AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अब तक 56’, शिंदे सरकारने घेतला ‘या’ शहरांचा विकास करण्याचा निर्णय

केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहरे राबविण्याचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. राज्यातील गावांचे शहरीकरण आणि त्यातून नव्याने उद्दभवलेल्या समस्यांबाबत विविध यंत्रणांसोबत विचारविनिमय करण्यात आला.

'अब तक 56', शिंदे सरकारने घेतला 'या' शहरांचा विकास करण्याचा निर्णय
CM EKNATH SHINDEImage Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 17, 2023 | 1:07 PM
Share

मुंबई : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव, प्रशासक यांची 16 आणि 17 जून 2022 अशी दोन दिवसीय परिषद झाली होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, नागरी प्रशासन, पीक वैविध्य, तेलबिया आणि कडधान्यांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करणे या विषयांचा या परिषदेत समावेश होता. हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळेत संपन्न झालेल्या या परिषदेमध्ये राज्यांना आकांक्षित शहरे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने शिंदे सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहरे राबविण्याचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. राज्यातील गावांचे शहरीकरण आणि त्यातून नव्याने उद्दभवलेल्या समस्यांबाबत विविध यंत्रणांसोबत विचारविनिमय करण्यात आला. त्यानुसार नागरीकरण झालेल्या ‘ड’ वर्ग महानगरपालिका, ‘ब’ आणि ‘क’ वर्ग नगरपरिषद, नगरपंचायतीमधील शहरांचा समतोल, कालबध्द व सर्वसमावेशक विकास करण्याच्यादृष्टीने राज्यातील आकांक्षित शहरे निश्चित करण्यात आली आहेत.

सदर शहरांची निवड करण्यासाठी खालील निकष वापरण्यात आले आहेत.

1) दरडोई महसूल ( Own revenue per capita )

2) पाणी पुरवठा ( water supply LPCD )

3) पक्क्या घरांची टक्केवारी ( % of pakka houses in PMAY )

4) अनु. जाती-जमाती लोकसंख्या टक्केवारी

5) GFC Star ranking

स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकार

‘ड’ वर्ग महानगरपालिकांपैकी निवड केलेल्या 9 महानगरपालिका : अकोला, परभणी, लातूर, सोलापूर, मालेगाव ((नाशिक), जळगांव, नांदेड वाघाळा, भिवंडी, उल्हासनगर

‘ब’ वर्ग नगरपरिषदांपैकी निवड केलेल्या 12 नगरपरिषदा : देगलूर, आर्वी, सेलू, वसमतनगर, गंगाखेड, माजलगांव, मनमाड, सिल्लोड, जिंतूर, पैठण, मुर्तिजापूर, नांदूरा

‘क’ वर्ग नगरपरिषदांपैकी निवड केलेल्या 18 नगरपरिषदा : औसा, किनवट, गडचांदूर, लोहा, नेर नबाबपूर, मुदखेड, मानवत, तळोदा, चांदूरबाजार, पातूर, बिलोली, नळदुर्ग, मुरुम, परतूर, मुखेड, इगतपुरी, कन्हान-पिंपरी, पाथरी

नगरपंचायतींपैकी निवड केलेल्या 18 नगरपंचायती : मानोरा, मालेगांव – जहॉगिर, अर्धापूर, सडक – अर्जुनी, माहूर, सिंदखेडा, मंठा, भातकुली, मोखाडा, पाली, नायगांव, अंगार, भामरागड, फुलंब्री, नशिराबाद, एटापल्ली, बार्शीटाकळी, पालम

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.