महाराष्ट्रात काही भागांत कडक लॉकडाऊन होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले स्पष्ट संकेत

राज्यातील काही भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केले जाईल. या लॉकडाऊनची घोषणा करण्याआधी सरकारी अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली जाणार आहे. (There will be severe lockdown in some parts of Maharashtra, Chief Minister gave clear signal)

महाराष्ट्रात काही भागांत कडक लॉकडाऊन होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले स्पष्ट संकेत
महाराष्ट्रात काही भागांत कडक लॉकडाऊन होणार
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 12:52 AM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस आणखी भयानक बनत चालली आहे. कोरोनाग्रस्तांचा दिवसभरातील आकडा 14 हजारांच्या पुढे गेल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊनचे ढग घोंघावू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यातील काही भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केले जाईल. या लॉकडाऊनची घोषणा करण्याआधी सरकारी अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असून, आरोग्य कर्मचारी कोरोना नियंत्रण, काँट्रॅक्ट ट्रेसिंग आणि उपचाराच्या कामात गुंतले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. (There will be severe lockdown in some parts of Maharashtra, Chief Minister gave clear signal)

अनेक भागांत नियमांचे सर्रास उल्लंघन

अनेक भागांत दंडात्मक कारवाईचा कठोर बडगा उगारूनही बहुतांश नागरिक विनामास्क फिरत आहेत. या लोकांना कोरोनाचा फैलाव भयावह स्थितीत पोहोचला आहे. राज्यात एका दिवसातील कोरोना रुग्णांच्या संख्येने रशिया, ब्रिटनमधील दिवसभराचा आकडा मागे टाकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना फैलावावर केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे.

नाईलाजाने नियम कडक करावे लागणार

कोरोनाची लाट वाढू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्याकडे पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीते पालन केले पाहिजे. लस घेतली तरीही ही त्रिसूत्री पाळावीच लागेल, बेफिकिरीने वागून चालणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगतिले.

राज्यात आज 57 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

आज राज्यात 14 हजार 317 नवीन रुग्ण साडल्यानंतर आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22,66,374 झाली आहे. राज्यात आज 57 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.32 % एवढा झाला आहे. राज्यात आज 7,193 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 21,06,400 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.94 % एवढे झाले आहे. (There will be severe lockdown in some parts of Maharashtra, Chief Minister gave clear signal)

इतर बातम्या

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्र्यांच्या संवादावर MPSCचे विद्यार्थी नेमकं काय म्हणतायत?

धोका वाढला! राज्यात आज 14 हजार 317 कोरोना बाधित सापडले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.