AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्र्यांच्या संवादावर MPSCचे विद्यार्थी नेमकं काय म्हणतायत?

मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढ्या दिवसात आयोगाला तयारी करता आली नाही का? मग आता 8 दिवसात तयारी कशी होणार? असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्र्यांच्या संवादावर MPSCचे विद्यार्थी नेमकं काय म्हणतायत?
| Updated on: Mar 11, 2021 | 9:42 PM
Share

पुणे : MPSC पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयावर राज्यभरात हजारो विद्यार्थी शुक्रवारी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूरसह राज्यातील अनेक शहरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. पुण्यातील आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षेची पुढची तारीख उद्या जाहीर करु आणि आठवडाभरातच परीक्षा होईल, असं आश्वासन दिलं आहे.(opinion of the students on the assurance of the CM uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांच्या संवादावर विद्यार्थ्यांचं मत काय?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेसाठी मोठी यंत्रणा लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कुठलाही धोका होणार नाही, अशा स्वरुपात यंत्रणा तयार करुनच परीक्षा घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढ्या दिवसात आयोगाला तयारी करता आली नाही का? मग आता 8 दिवसात तयारी कशी होणार? असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

विद्यार्थ्यांचा लढा हा राजकारणाशी संबंधित नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विरोधी पक्षाचे नेते आले काय किंवा सत्ताधारी आले काय? आम्हाला त्याच्याशी देणंघेणं नाही. राजकारणाचं नाव देऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करु नका, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी केली आहे.

कोरोनाच्या नावाखाली जिवाशी खेळ

कोरोनाच्या नावाखाली सरकार विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोपही एका विद्यार्थ्यानं केला आहे. दोन वर्षे झालं परीक्षा नाही, MPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? असा प्रश्नही सरकारला केला आहे. महाराष्ट्रातील 4 लाख विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. कोरोनाचं कारण सांगत आहेत, मग उद्या परीक्षा घेतली काय किंवा 8 दिवसांनी घेतली काय, फरक काय पडणार आहे. सरकार विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

पडळकरांनी दिशा दिली

गोपीचंद पडळकर यांनी राजकारण केलं नाही तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांनी 1 – 2 दिवस निषेध व्यक्त केला असता. सरकारने नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण पडळकरांमुळे हा मुद्दा तडीस जाण्यास मदत होणार आहे, असंही काही विद्यार्थ्यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा,परीक्षा 8 दिवसात, उद्याच तारीख जाहीर होणार

EXCLUSIVE : पळपुटेपणा नको, मुलांचं वय वाया गेलं, संधी हुकली तर जबाबदार कोण, MPSC परीक्षा आताच घ्या : देवेंद्र फडणवीस

opinion of the students on the assurance of the CM uddhav Thackeray

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.