ठाकरे गटातून शिवसेनेत आलेला हा खासदार होणार मंत्री, शिंदेंना केंद्रात किती मंत्रिपदं? मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. विधान परिषद निवडणूक आणि संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र एकीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच आता दुसरीकडे मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या विस्तारामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दोन मंत्रिपद येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन जणांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यातील एका खासदाराला आता मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दोन मंत्रिपदं येणार आहेत, ज्यामध्ये एक मंत्रिपद हे श्रीकांत शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे. तसं दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात आलेले खासदार बंडू जाधव यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, असं माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बंडू जाधव यांना आता मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान मंत्रिपदासाठी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती मात्र आता शिवसेना शिंदे गटातून मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे आणि बंडू जाधव यांची नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
