AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ‘तुझे तुकडे तुकडे करू तूला…’, भाजप नेत्याला धमकीचं पत्र

मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजप आमदाराला धमकीचं पत्र आलं आहे.

मोठी बातमी! 'तुझे तुकडे तुकडे करू तूला...', भाजप नेत्याला धमकीचं पत्र
| Updated on: Feb 21, 2025 | 2:34 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजप आमदाराला धमकीचं पत्र आलं आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले या भाजपच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. या पत्रानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली होती,  हे प्रकरण ताजे असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीच पत्र मिळाले आहे. ‘तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती,’ असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महालेंनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणात आमदार महाले दुपारी आपल्या कार्यकर्त्यांह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणार आहेत .

श्वेता महाले यांची प्रतिक्रिया

यावर प्रतिक्रिया देताना महाले यांनी म्हटलं की. मी या प्रकरणात तक्रार दाखल करणार आहे. पोलिसांनी अशा लोकांन समोर आणून त्यांचा बुरखा फाडावा . दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा या पत्रातील मजकूर आहे. समाजात तेढ  निर्माण करणाऱ्या समाज कंठकांचा बुरखा फाटला पाहिजे.  त्यांच्यांविरोधा कडक कारवाई झाली पाहिजे.  धमकी देणाऱ्या लोकांविरोधात सरकारने पाऊल उचललं पाहिजे.

मागच्या काळात माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे झाली. काँग्रेसच्या काळात एवढी विकास कामे कधी झालीच नाहीत. आम्ही कधी जाती भेद केला नाही, निवडणुकीत काँग्रेसने धर्माचे राजकारण केले . त्याचा राग ठेऊन हे धमकीचं पत्र मला आलं आहे.  मौलवी सांगतात तसे डोक्यात ठेवल्या जाते. मला माझ्या मतदारसंघात सुरक्षेची काही गरज नाही, असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात आता त्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...