AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित

आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे 6 बंडकोर खासदार हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 4:05 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी फक्त 4 खासदारांचीच उपस्थिती होती, त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये राज्याने ऑपरेशन टायगर पाहिलं. 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली, हे सर्व खासदार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे.

तर दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे, परंतु या बैठकीला तीन आमदार उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संजय पोतनीस, आमदार संजय दरेकर आणि आमदार राहुल पाटील हे या बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. आमदारांची उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकस्थळी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

बंडखोर खासदांराची शिंदेंसोबत बैठक 

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून बंड केलेले सर्व खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या सर्व बंडखोर खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक सुरू आहे. गेल्या दोन तासांपासून ही बैठक सुरू आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. या खासदारांचं बंड हा शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे जिथे-जिथे बंडखोरी झाली, त्या सर्व मतदारसंघात आता उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप