AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स्प्रेसने प्रवास ठरतोय धोक्याचा! त्या पोस्टनंतर खळबळ, संशयित प्रवासी मुंबईत अन्…

रेल्वे प्रशासन कायम सांगत असतं की, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास रेल्वे प्रशासनाला कळवा... आता देखील असंच काही झालं आहे. ज्यामुळे एक्स्प्रेसने प्रवास करणं धोक्याचं ठरत आहे... त्या पोस्टनंतर ATS ने गंभीर दखल घेतली आहे... तर जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

एक्स्प्रेसने प्रवास ठरतोय धोक्याचा! त्या पोस्टनंतर खळबळ, संशयित प्रवासी मुंबईत अन्...
| Updated on: Aug 10, 2026 | 11:09 AM
Share

प्रवाशांना सूचित करण्यात येते की, रेल्वे परिसरात किंवा रेल्वेगाडीत कोणतीही संशयास्पद वस्तू, बॅग किंवा पॅकेट आढळल्यास तात्काळ रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल किंवा जवळच्या रेल्वे कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. प्रवाशांनी सतर्क राहून रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे…. अशी सुचना कायम रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना देण्यात येत असते. पण आता तर एक्स्प्रेसमध्ये एक – दोन नाही तर, तब्बल तीन संशयित प्रवासी आढळल्याने खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर खबरदारी लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. तर जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या पोस्टमध्ये काय लिहिलेलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रतलामहून मुंबईकडे येणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये तीन संशयित प्रवासी असल्याची पोस्ट एका प्रवाशाने सोशल मीडियावर केली. त्यानंतर मोठी खळबळ उडाली. पोस्ट पाहिल्यानंतर पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर करण्यात आलेल्या संशयास्पद पोस्टची एटीएसने घेतली गंभीर दखल घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे.

विशाल राणा नावाच्या व्यक्तीने पोस्ट करत रतलाम (मध्य प्रदेश) येथून अवंतिका एक्सप्रेसच्या S3 कोचमधून तीन संशयित व्यक्ती प्रवास करत असल्याचा दावा केला. त्यानंतर, मुंबई ATS कंट्रोलला सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर सतर्कता वाढवण्यात आली आहे. पोस्टनुसार, रतलाम (मध्य प्रदेश) येथून अवंतिका एक्स्प्रेसच्या S3 कोच, सीट 17 व 19 मधून तीन संशयित व्यक्ती मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पोस्टमध्ये बोरिवली स्थानकावरील CCTV फुटेज तपासण्याचेही महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनंतर ATS कंट्रोलने ही माहिती संबंधित ATS चारकोप युनिटच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पाठवली असून पुढील पडताळणी सुरू आहे. संबंधित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची माहिती ATS पडताळली जात आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा