AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा, मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

काही दिवसांपूर्वी शिवेसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती. 9 पैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची सात सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यानंतर आता उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा, मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये
Omraje Nimbalkar, Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 19, 2026 | 10:17 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. राज्यात झालेल्या ऑपरेशन टायगरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. पक्षात फूट पडण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ तीनच खासदार उरले असून, शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे. दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा झटका होता. एकाचवेळी सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली.

ज्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता. सुरुवातीला ओमराजे निंबाळकर यांची भूमिका तळ्यात-मळ्यात होती, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं देखील टेन्शन वाढलं होतं, परतु शेवटी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची घोषणा ओमराजे निंबाळकर यांनी केली. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर धाराशिव मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील पार पडली होती, या सभेत उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहेत. आज मुंबईतील ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धाराशिवमधील नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीला किती नगरसेवक उपस्थित राहणार यावरून, ओमराजे यांच्यासोबत किती नगरसेवक आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत किती नगरसेवक हे स्पष्ट होणार आहे. ओमराजे यांनी शिवसेना शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीनंतर आता किती नगरसेवक हे ओमराजे यांच्यासोबत आहेत, आणि किती नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण