भारतातील सर्वाधिक तापमानांच्या शहरात अकोला दुसऱ्या क्रमांकावर, टॉप 10 शहरं कोणती?

राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना, सूर्यदेवही आग ओकताना पाहायला (Akola in top ten hottest city list) मिळत आहे. राज्यात तापमान वाढत आहे.

भारतातील सर्वाधिक तापमानांच्या शहरात अकोला दुसऱ्या क्रमांकावर, टॉप 10 शहरं कोणती?

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना, सूर्यदेवही आग ओकताना पाहायला (Akola in top ten hottest city list) मिळत आहे. देशातील सर्वाधिक तापमानाच्या टॉप 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. मंगळवारी 26 मे रोजीच्या आकडेवारीनुसार, राजस्थानातील चुरु इथे तब्बल 47.5 अंश सेल्सिअस इतकं देशातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं. त्याखालोखाल महाराष्ट्रातील अकोल्यातही तब्बल 47.4 इतक्या तापमानाची नोंद झाली. स्कायमेट या हवामान संस्थेने ही आकडेवारी जारी केली. (Akola in top ten hottest city list)

टॉप टेन ‘हॉट’ शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अकोला (47.4), तिसऱ्या क्रमांकावर नागपूर (47.0) तर चंद्रपूर (46.8) सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातल ही तीन शहरं देशात टॉप टेन सर्वाधिक तापमानाच्या यादीत आहेत.

देशातील टॉप 10 सर्वाधिक तापमानाची शहरं


चंद्रपूरचा पारा चढताच
आधीच कोरोनाचा प्रसार त्यात उष्णतेची लाट आल्यामुळे चंद्रपूरसह विदर्भात पुढचे काही दिवस सर्वोच्च तापमानाचे राहणार आहेत. एकीकडे भयभीत करणारा कोरोना, तर दुसरीकडे भाजून काढणारं तापमान अशा दुहेरी कचाट्यात चंद्रपूरकर सापडले आहेत. जिल्ह्यात 46.8 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाल्यानं नागरिक चांगलेच घामाघूम झाले आहेत.

एरव्ही थंडपेयांच्या दुकानात दिसणारी गर्दी आता दिसत नाही. लस्सी असो, उसाचा रस असो किंवा बाटलीबंद शीतपेय असो, लोक हात लवायलाही घाबरत आहेत. चंद्रपुरात कोरोनाचे 22 रुग्ण सापडल्यानंतर ही भीती आणखीच वाढली आहे. पाच वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठानांना सूट असल्यानं लोक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र आधीसारखं त्यांना शीतपेय पिण्याची इच्छा दिसत नाही. तापमानानं 47 अंशाकडे वाटचाल सुरु केली आहे.

येणाऱ्या दिवसात तापमान आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळं नागरिकांसाठी बाहेर पडणं अवघड झालं आहे. बाहेर पडले तरी काहिली शांत करण्याचे उपाय ते टाळत आहेत. कोरोना आणि वाढलेलं तापमान, यामुळं आता चंद्रपूरकरांना खऱ्या अर्थानं घरीच राहून सुरक्षीत राहावं लागणार आहे.

कोरोनाचं संकट डोक्यावर घोंगावत असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. पण एक भीती त्यांच्याही मनात कायम आहे. या भीतीपोटीच ते बाहेरच्या खानपानास टाळत आहेत. त्यामुळं शितपेयांची दुकानं ओस पडलेली दिसत आहेत. नागरिक स्वतःचा बचाव करुन बाहेर पडत आहे. दुसरीकडे तापमान वाढीस लागल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घरीच रहा-सुरक्षीत रहा, हा मंत्र प्रशासन कित्येक दिवसांपासून सांगत आहे. पण नागरिक त्याला प्रतिसाद देईनासे झाले होते. हे काम आता तापमानानं सोपं केल्याचे चित्र आहे.

(Akola in top ten hottest city list)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *