TOP 9 Headlines | 17 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

TOP 9 Headlines | 17 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट  | एका मिनिटात 9 बातम्या
आजच्या महत्वाच्या बातम्या
Image Credit source: tv9

आज 17 मार्च, 2022, आज राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही, अशी हाक शरद पवारांनी दिलीय. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही महाविकास आघाडीला आव्हान दिलंय.

दादासाहेब कारंडे

|

Mar 17, 2022 | 6:26 PM

  1. भाजपला राज्यात पुन्हा येऊ देणार नाही, शरद पवारांची गर्जना; युवा आमदारांनाही कामाला लागण्याचे आदेश, आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट, वाचा सविस्तर
  2. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी एकमेकांना भरविला विजयाचा पेढा, नागपुरात दोघांचाही जल्लोषात सत्कार, फडणवीस पुन्हा म्हणाले… ये तो अभी झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, वाचा सविस्तर
  3. पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई नको, प्रविण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा, मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणात दरेकर अडचणीत, इतर भाजप नेतेही चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता, वाचा सविस्तर
  4. हा तर गोपनीयतेचा भंग’, तेजस मोरेविरोधात प्रवीण चव्हाण यांची पोलिसांकडे धाव, फडणवीसांना पुरावे पुरवल्याचा चव्हाणांचा आरोप, फडणवीसांनी पेनड्राव्हच्या माध्यमातून टाकलेला व्हिडिओ बॉम्ब, वाचा सविस्तर
  5. मुंबईचा पारा 40 अंशावर, मार्चमध्येच लाहीलाही, मुंबईकर उष्णतेच्या सावटाखाली, राज्यभर उन्हाचा कडाका वाढला वाचा कुठे किती तापमानाची शक्यता, वाचा सविस्तर
  6. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करणार, तर गोव्यातलं नाराजी नाट्य सुरूच, वाचा सविस्तर
  7. 84 किलोचा रुबाबदार ‘शेरा’ कुणी पळवला? इंदापूर तालुक्यातील बोकडाच्या चोरीची चर्चा, तर अंबरनाथमध्ये पालिका भवनात कर्मचाऱ्यांची दारूपार्टी, वाचा सविस्तर
  8. द काश्मीर फाईलची चर्चा सुरूच, नाना पाटेकर म्हणतात गट पडणं साहजिक पण द्वेषाचा बिबा पुरणं चुकीचं, तर चित्रपट कमावईचे रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर, वाचा सविस्तर
  9. राजस्थानच्या टीमला प्रशिक्षण देणार लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्सचे मॅनेजमेंट मलिंगाच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा, तर दुसरीकडे विराट कोहली होतोय ट्रोल, वाचा एका क्लिकवर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें