AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालखी मार्गावर परिवहन विभागाचा चित्ररथ, रस्ते आणि वाहन सुरक्षेचे धडे देणार

या अभिनव उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक स्वतः उद्या दिनांक ११ जून रोजी या पालखी मार्गाने पंढरपूर येथे जाणार आहेत.

पालखी मार्गावर परिवहन विभागाचा चित्ररथ, रस्ते आणि वाहन सुरक्षेचे धडे देणार
| Updated on: Jun 10, 2025 | 10:07 PM
Share

सर्वांना आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. यात आता संत तुकारामाची पालखी येत्या १८ जूनपासून देहू येथून प्रस्थान करणार आहे. या पालखीच्या मार्गावर आता राज्याच्या परिवहन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ फिरणार आहे. यामुळे राज्याच्या परिवहन विभागाच्या तसेच रस्ते सुरक्षा संदर्भात विविध माहितीद्वारे जनप्रबोधन करण्यात येणार आहे.

राज्याच्या परिवहन विभागाचा जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाचा चित्ररथ यंदा तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर दिंडी सोबत मार्गक्रमण करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात नियोजन आणि मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री सरनाईक हे स्वतः उद्या (११ जुन रोजी) पंढरपूरपर्यंत या पालखी मार्गाचा दौरा करणार आहेत.

रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षण आणि प्रबोधन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले, संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहू येथून प्रस्थान करणार आहे. १८ जून ते ५ जुलै दरम्यान संपूर्ण पालखी मार्गावर दिंडीसोबत परिवहन विभागाने तयार केलेल्या एलईडी स्क्रीन, पोस्टर , बॅनरच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ सहभागी होणार आहे. या पालखी मार्गावर विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि भक्तगण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून परिवहन योजनांची विशेषतः रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षण आणि प्रबोधन, सुरक्षित वाहन चालवणे अशा विविध योजनांची माहिती देण्यासाठी, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या अभिनव उपक्रमाची यंदापासून सुरुवात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले.

Follow Us
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल