तुळजाभवानी नवरात्रोत्सव; रोज 15 हजार भाविकांनाच दर्शन, पुजारी आणि सेवेकरींसाठीही नियम!

नवरात्रोत्सव काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक तुळजापूर येत असतात. शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही भाविक दर्शनासाठी तुळजापुरात येत असतात. त्यामुळे रोज 15 हजार भाविकांची मर्यादा वाढवण्यात यावेळी अशी मागणी स्थानिक नागरिक, पुजारी आणि भाविकांकडून होत आहे.

तुळजाभवानी नवरात्रोत्सव; रोज 15 हजार भाविकांनाच दर्शन, पुजारी आणि सेवेकरींसाठीही नियम!
तुळजाभवानी


उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सूरु होण्यापूर्वी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भाविकांच्या प्रवेशाच्या संख्येबाबत एकाच दिवशी 2 वेगवेगळे आदेश काढले. त्यामुळे भाविकांमध्ये काही काळ मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला होता. दिवेगावकर यांनी सुरुवातीला तुळजाभवानी मंदिरात 30 हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल असे लेखी आदेश काढले. हे आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या ग्रुपवर जिल्हाधिकारी यांचा दुसरा आदेशही धडकला. त्यात दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आली होती. हा आदेशही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र 15 हजार भाविकांनाच प्रवेश असेल याबाबत मंदिर संस्थानच्या नियमावलीची प्रेस नोट जाहीर झाली आहे. (Only 15,000 devotees will get entry in Tulja Bhavani temple every day during Navratri festival)

दरम्यान, नवरात्रोत्सव काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक तुळजापूर येत असतात. शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही भाविक दर्शनासाठी तुळजापुरात येत असतात. त्यामुळे रोज 15 हजार भाविकांची मर्यादा वाढवण्यात यावेळी अशी मागणी स्थानिक नागरिक, पुजारी आणि भाविकांकडून होत आहे.

घटस्थापना झाल्यावर 6 तासांनी प्रवेश

7 ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी देवीची मूळ मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता देवीच्या सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येईल. त्यानंतर शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. मंदिर पहाटे उघडण्यात येणार असले तरी भाविकांना, तसंच पूजारी व सेवेकरींनाही तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी 6 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. घटस्थापना झाल्यावर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक, पुजारी उत्सुक असतो. मात्र त्याला दर्शनासाठी वाट पाहावी लागणार आहे.

नियम काय? कुणाला प्रवेश नाही?

>> शारदीय नवरात्र महोत्सव 2019 साली पुजाऱ्यांना दिलेले ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य

>> मास्क बंधनकारक राहणार

>> मंदिरात पुजाऱ्यांना प्रवेश करते वेळी ड्रेसकोड आवश्यक

>> मंदिर गाभारा आणि मंदिर परिसरात भाविकांचे कोणतेही कुलाचार विधी होणार नाहीत.

>> कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

>> मंदिरात 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त, गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालकांना प्रवेश नाही

कोजागिरी पौर्णिमा रद्द, 3 दिवस प्रवेश बंदी

मंदिरात मर्यादित स्वरूपात ऑनलाईन प्रवेश पासची सुविधा मंदिराच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र हे ऑनलाईन पास 15 हजार भाविकांपैकी असतील की अतिरिक्त हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंदिर परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी असणार आहे. कोजागिरी पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर 18 ते 20 ऑक्टोबर या 3 दिवसात तुळजापूर शहर व्यतिरिक्त इतरांना तुळजापूर शहरात प्रवेश बंदी असणार आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहेत.

इतर बातम्या :

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं

Only 15,000 devotees will get entry in Tulja Bhavani temple every day during Navratri festival

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI