
जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सोमवारी पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर झाला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अनेकदा भावूक झाले. यजमान राज्याचा मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री म्हणून पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली होती, मात्र यात कमी पडलो.. अशा शब्दांत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. हल्ल्याविरोधात काश्मिरी जनतेमध्ये उमटलेला अभूतपूर्व संताप ही दहशतवादाच्या अंताची सुरुवात असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. तर दुसरीकडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी यांच्या नावांची चर्चा आहे. दाते सध्या एनआयएमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या नियुक्तीची शक्यता कमी आहे. रितेश कुमार, अमिताभ गुप्ता आणि संजीवकुमार सिंघलही शर्यतीत आहेत. तर रितेश कुमार आघाडीवर आहेत. महिला अधिकारी म्हणून अर्चना त्यागी किंवा विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचाही विचार होत असल्याची चर्चा सुरू आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
कल्याण पोलिसांकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरीकांची शोध मोहिम सुरू आहे. कल्याणच्या डीसीपी स्कॉर्ड आणि विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सहा बांगलादेशी नागरीकांना अटक केली आहे. हे बांगलादेशी नागरीक प्लंबर आणि वायरमनचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
शिरूरच्या करंदी येथील चाकण – शिक्रापूर रस्त्यालगत असलेल्या टायरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आग लागल्याने परिसरातील ७ ते ८ दुकान आणि टपऱ्या या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. भर उन्हाची तीव्रता असल्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न तोकडे पडत आहेत.
जे शरद पवारांच्या काळात झाले नाही ते फडणवीस यांच्या काळात झाले. भाजपाचा DNA ओबीसी चा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सांगावे, अशी विचारणा लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटणार पण नाही , हा वाद वाढत जाणार आहे असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचे वेगवेगळी वक्तव्य करत आहे. त्याच्यात एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष सुरू झाला आहे आणि तो वाढत जाणार आहे, असे पवार म्हणाले.
पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना 50 लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तर असावरी जगदाळे यांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरातून काही दिवसांपूर्वी पाच शूटरला अटक केले असून त्यात एक आरोपी बिस्नोई गँगच्या संपर्कात असल्याचा तपासात खुलासा झाला आहे.
जलसंपदा विभागाचे तीन कंपन्यांसोबत एकूण ९ करार संपन्न झाले. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करार पार पडले. राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. ५७ हजार ७६० कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी करार केला. तीन कंपन्यांसोबत केलेल्या करारातून ९ हजार २०० रोजगार निर्मिती होणार आहे. महाजेनको, एमआरईएल, आवादा कंपनी सोबत करार झाले.
जलसंपदा विभागाचे 3 कंपन्यांसोबत एकूण 9 करार संपन्न झाले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे करार संपन्न झाले आहेत. 57 हजार 760 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार करण्यात आले आहेत. राज्यात 8 हजार 905 मेगावॅट वीज निर्मीती होणार आहे. महाजेनको, एमआरईएल, आवादा कंपनी सोबत करार झाले आहेत.
वांद्र्यातील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये लागलेली आग 10 तासानंतरही सुरुच आहे. आग नियंत्रण आणण्यात अग्नीशमन दलाला अपयश आले आहे. मॉलच्या काचा फुटून थेट रस्त्यावर पडत असल्याने जास्त भिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी आजूबाजूची दुकाने बंद करून परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. नागरिकांना 50 मीटर अंतरावर थांबवण्यात येत असून सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढवला. पण अद्यापही आग नियंत्रणात आणण्यात यश आलेलं नाही.
पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे. जगदाळे कुटुंबातील मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.
पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
सोलापूर : मोहोळमध्ये जावयानेच केला सासऱ्याचा चाकू भोसकून खून केला. रामहिंगणे गावातील धक्कादायक घटना. कौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरे आणि मेव्हणा यांच्यावर चाकूने केले वार, यामध्ये सासू आणि मेव्हण्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत तर सासऱ्याचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये वणी-नांदुरी रस्त्यावर भाविकांनी भरलेला टेम्पो उलटला. 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वळणावर अंदाज न आल्याने ट्रक उलटल्याची माहिती दिली. जखमींवर वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छत्तीसगड-तेलंगण राज्यातील करेगुट्टा डोंगरावर जवळपास सात दिवसापासून मोठ्या संख्येत पोलीस जवानांच कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र- छत्तीसगड सिमावर्ती भागातही कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. मोठ्या संख्येत डोंगराळ भागात नक्षलवादी लपले असल्याची माहिती
वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमधील भीषण आग पुन्हा भडकली. नियंत्रण आणण्यात अपयश. मॉलच्या काचा फुटून थेट रस्त्यावर पडत असल्याने धोक्याची स्थिती. पोलिसांनी आजूबाजूची दुकाने बंद करून परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. नागरिकांना ५० मीटर अंतरावर थांबवण्यात येत असून सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढवला.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसाचा पाकिस्तानी सैन्याशी थेट संबंध आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, हाशिम मूसा दहशतवादी बनण्याआधी पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे. काश्मीरमध्ये 48 पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत.
सोलापुरात कांद्याला प्रति किलो केवळ 5 ते 6 रुपये भाव… आवक कमी असूनही कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झालाय… काही शेतकऱ्यांना केवळ 1 ते दीड रुपया प्रति किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त… एकीकडे अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्याने आपला कांदा लिलावासाठी आणलाय… मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल… सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी
२५ ते ३० अग्निशामक गाड्यांच्या साहाय्याने युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू… मात्र आगीमुळे संपूर्ण वांद्रे परिसर धुराखाली; उंच इमारतीवरून धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत.
न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित महिला आरोपी मनीषा माने यांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज… संशयित महिला आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जामीनासाठी सादर करण्यात आला अर्ज… मनीषा माने सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी… त्यामुळे बहुचर्चित असलेल्या या प्रकरणातील महिला आरोपी मनीषा माने यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष…
गंगापूर धरणात सध्या ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक… वाढत्या बाष्पीभवनामुळे गंगापूर धरणातील पाणी झपाट्याने कमी… पाणीसाठा टिकवण्यासाठी कश्यपी धरणातून २००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग… गंगापूर धरणातून शेती आणि औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी होणार पाणी वापर… नाशिककरांना सद्या तरी पिण्याच्या पाण्याची अडचण नाही…
जळगावच्या पारोळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. लवकरच मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत डॉ. सतीश पाटील कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावामध्ये अवकाळी पावसाने सफरचंदाच्या बागेचं मोठं नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि पावसामुळे सफरचंद बाग उद्धवस्थ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातून १७ पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. हे नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णयास राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सहमती दर्शवली आहे. सध्या जे पी नड्डा हेच अध्यक्ष राहणार आहे.
उल्हासनगरमधून १७ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलंय. शॉर्ट टर्म व्हिसावर नातेवाईकांना भेटण्यासाठी हे नागरिक आले होत. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माहिती दिली.
धाराशिव-तुळजाभवानीच्या व्हीआयपी दर्शन पासचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तुळजापूर शहरातील नागरिकांनी आणि पुजाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देण्यात येणारे व्हीआयपी पास बंद करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराज निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केली.
मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गेल्या तीन दिवसांपासून अपघात होत आहेत. काल रात्री बोरिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची एकमेकांवर धडक झाली. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयासमोर अचानक तीन-चार वाहनं एकमेकांवर धडकले. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालं नाही. काल सकाळीही अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही वाहनांची अशाच प्रकारे टक्कर झाली होती.
मुंबई वांद्रे परिसरात लिंक स्कोअर मॉलच्या बेसमेंटमध्ये रात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात मॉलमध्ये असलेले शेकडो दुकानं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या 30 ते 35 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग अद्याप नियंत्रणात येत नसून सध्या आग विझवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून रोबॉटिक मशीनचा वापर केला जात आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह एनडीआरएफची टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली आहे.
नाशिकमध्ये आज काँग्रेसकडून सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित असतील. नाशिकमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.
ठाण्यातील गणेशवाडी पाचपखाडी परिसरात तुळजाभवानी मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तुळजाभवानी देवीला सात वेगवेगळ्या नदी आणि सात समुद्रांच्या पाण्याने मूर्तीला अभिषेक करून मूर्ती शास्त्रीय पद्धतीनुसार जलाधिवास पूजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी देखील पहिल्यांदा जलाधिवास पूजन केलं.
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी यांच्या नावांची चर्चा आहे. दाते सध्या एनआयएमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या नियुक्तीची शक्यता कमी आहे. रितेश कुमार, अमिताभ गुप्ता आणि संजीवकुमार सिंघलही शर्यतीत आहेत.
वांद्रे पश्चिम इथल्या लिंक स्क्वेअर इमारतीला आग लागली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.