
खरीप हंगामासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर. खरीप हंगामासाठी नव भरारी पथकाची कृषी विभागात नियुक्ती. साठेबाजी आणि जास्त दराने खत विक्री केलास भरारी पथक कारवाई करणार. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविण्याचे केले जिल्हा कृषी अधीक्षक आणि आव्हान. जिल्ह्यामध्ये 76960 मेट्रिक टन खताची गरज. जिल्ह्यात 30942 मेट्रिक टन खत उपलब्ध. जिल्ह्यात 40 टक्के खत उपलब्ध 60 टक्के खताचे मागणी कृषी विभागाकडे. उल्हास आणि वालधुनी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची MPCB कडून तपासणीला सुरुवात. MPCB कडून कल्याण बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथून ७० सांडपाण्याचे नमुने घेतले; रासायनिक प्रदूषक घटकांचा अभ्यास सुरू. उल्हास आणि वालधुनी नदी प्रदूषणाच्या विरोधात नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा दबाव. नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या मागणीनंतर शासकीय यंत्रणा जाग्या; उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याच्या मोहिमेनंतर आता सांडपाण्याचे स्रोत शोधून संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली.
बुलडाण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून संपूर्ण कर्जमाफीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, वीज बिल माफ करावे, शेतीला संरक्षण म्हणून तार कंपाऊंड द्यावे, शेती मलाला योग्य भाव द्यावा , पीक विमा देण्यात यावा , यासह विविध मागण्यासाठी ठाकरे गटाकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर आणि शिवसैनिकांनी सहभाग घेतला. शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते.
सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे. 40 तोळे सोने लंपास करणारा चोरट्याला अवघ्या 4 तासात जेरबंद करण्यात आलं आहे. सांगलीतल्या पुष्पराज चौक येथे बँकेत सोने ठेवण्यासाठी आलेल्या वृद्धाला धूम स्टाईलने लुटण्यात आलं होतं. वृद्ध ध्यानचंद सगळे यांचे 40 तोळे सोने असलेले दागिन्यांची बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने बँकेच्या दारातूनच लंपास केली होती. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने सोन्याच्या दागिन्यासह चोरट्याला अटक केली.
पहलगाम हल्ल्यापासून भारतात राहणाऱ्या सहा कथित पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांची मागणी योग्य अधिकाऱ्यांसमोर मांडण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट आहे. त्याने न्यायालयाला सांगितले की आम्हाला सीमेवर ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत, आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहेत, आधार कार्ड आहेत.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी तिरुअनंतपुरममधील विझिंजम बंदराच्या उद्घाटन समारंभात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. ते म्हणाले, “गेल्या महिन्यात पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्घृणपणे मारलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून मी सुरुवात करू इच्छितो. त्यांचे नुकसान आपल्याला देशविरोधी आणि फुटीरतावादी शक्तींपासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी एकत्रित राहण्याची तातडीची गरज आहे याची आठवण करून देते.”
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दल (IAF) फ्लायपास्ट करताना दिसले. हवाई दल येथे टेक-ऑफ आणि लँडिंगचा सराव करत आहे. युद्ध किंवा राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी धावपट्टी म्हणून एक्सप्रेसवेची क्षमता तपासण्यासाठी हा सराव आयोजित केला जात आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, “पंतप्रधान असे का बोलत आहेत हे मला कळत नाही….पंतप्रधान असे असतील ज्यांची रात्रीची झोप उडेल, इंडिया अलायन्स, राहुल गांधी किंवा काँग्रेसची नाही. जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्यावर जास्तीत जास्त दबाव आणणार आहोत. त्यांनी महिला आरक्षण विधेयकासारखी घोषणा केली… आम्ही शांतपणे झोपू, पण पंतप्रधानांना झोपणे कठीण होणार आहे.”
दहशतवादी हल्ल्यानंतरही नागपूर मधील पर्यटक पहेलगांमध्ये दाखल झाले आहेत. लहान मुलांना घेऊन पर्यटक दाखल झाले आहेत. मनात कुठलीही भीती वाटत नाही , कुठेही हिंदू मुस्लिम असा भेदभाव पाहायला मिळाला नाही
जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या शिरसोली परिसरातील गुलाबाच्या फुलांची शेती करणाऱ्या शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. फुल उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर दिसून आला. उन्हाच्या तीव्रतेमुळे तलावातील मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर गावातील प्रकार आहे. उष्णतेमुळे तलावातील शेकडो मासे मृत झाले आहेत. तलावाच्या काठावर शेकडो माशांचा खच पडला आहे.
केंद्रीय जनशक्ती मंत्री सी.आर पाटील साई दरबारी दाखल झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते आज गोदावरी उजवा कालवा अस्तरीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात येणार आहे. सोलापूरातील भाजपच्या वतीने पेढे भरवत जल्लोष करण्यात येणार आहे.
नागपूर ते गोवा महामार्ग 12 जिल्ह्यातुन जातो. मात्र शेतकर्यांचा त्याला विरोध आहे. सिंधुदुर्गातून 12 गावातून महामार्ग जातो. त्यामुळे नुसती घनदाट जगलं नव्हे तर जैवविविधला कापून जाणारा मार्ग आहे. दोडामार्ग आणि सावंतवाडी इको सेन्सिटिव्ह तालुके आहेत. निसर्गाचा रास करून कुणाचा विकास करणार असे ठाकरे गटाचे नेते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सवाल केला.
भारतीय जनता पक्ष आणि जनता पक्षाचे मंत्री हे काँग्रेस पक्षाचे भ्रष्ट नकल आहे कार्बन कॉपी नाही भ्रष्ट नकल आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. अमित शहा बोलत आहेत चुन चुन के मारेंगे कोणाला सोडणार नाही मुळात जे घडलं आहे त्याला जबाबदार गृहमंत्री आहेत. ही जबाबदारी घेऊन आम्ही शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केले.
भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डर पुन्हा सुरू झाली आहे. अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडण्यात आले असून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
जळगावात शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर एजन्सीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील विक्रीसाठी असलेले संपूर्ण नवीन कुलर, फ्रिज यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक होऊन जवळपास 50 ते 60 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती असून काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत दुकानाच्या सर्व मजल्यावर आग पोहोचली. आठ ते दहा अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. मात्र भीषण आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची दहशत परसली असून तब्बल 1000 मदरसे बंद. 10 दिवसांसाठी मदरसे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत हल्ला करेल या भीतीने मदरसे बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली असून मदरशांमधील सर्व युवकांना पाकिस्तान मध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताच्या हल्ल्याचा धसका घेतला आहे.
घराघरात आक्रोश असताना मोदी मुंबई दौऱ्यावर येतात… पीएम मोदी फिरतायत, त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही… तुम्हील लढा आम्ही कपडे सांभाळतो… अशी मोदींची भूमिका… मोदी सिनेकलाकारांना भेटतात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात… पुलवामा, पहलगाम, उरीसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार… गृहमंत्र्यांचा राजीनामा यायला हवा होता… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेल कडून आकडेवारी जाहीर… पाकिस्तान इंडोनेशिया आणि मिडल इस्ट देशातून सायबर हल्ले झाल्याची माहिती… सरकारी कार्यालयातील पोर्टल आणि बँकिंग क्षेत्रात हल्ले झाल्याची सायबर सेलची माहिती…
लवकरच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे NIA अहवाल सादर करणार… अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तान लष्कराने कट रचल्याची माहिती… तब्बल दीडशे जणांची चौकशी केल्याचीही माहिती… घटनास्थळी मिळालेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या तपासासाठी पाठवल्या…
द्वारकामधील एका गावात घर कोसळल्याने चौघांचा मृत्यू… जोरदार वाऱ्यामुळे शेतात बांधलेल्या घरावर झाड कोसळल्याने घडली घटना… आई आणि तिच्या 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती… तर या घटनेत महिलेचा पती किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर…
नाशिक रोड भागात पुन्हा एका युवकाची हत्या. दोन जणांवर प्राणघातक हल्ला एकाच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. जुन्या भांडणाची कुरापत काढून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. हितेश डोईफोडे या युवकाचा हल्ल्यात झाला मृत्यू. विशेष म्हणजे हल्ला करून संशयित स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अधिक तपास सुरू.
100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमात सोलापूरचे एस.पी अतुल कुलकर्णी ठरले सर्वोत्तम पोलीस अधीक्षक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सोशल हँडलवर घोषणा. राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय अग्रेसर ठरले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे काम राज्यात पाचव्या क्रमांकावर लक्षवेधी ठरले आहे. कमी कालावधीत जिल्हाभरातील पोलीस स्टेशनमध्ये अमूलाग्र बदल घडवला आहे.
माजी आमदार अरुण काका जगताप यांचे निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये येथे सुरु होते उपचार. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार. अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. अरुण काका जगताप हे 2016 ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा गोळीबार. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर. काल रात्री, पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेवर (LoC) अनेक भागांमध्ये कुपवाडा, बारामुला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागात गोळीबार.