
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक संजय मोरे याला कमी दृश्यमानता आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. फिटनेस न तपासता कंत्राटदाराने त्याला बस चालवायला दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मुंबईत हवामान बदलाने थंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा, अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती पुढील एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाखरूड गावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. एसीबी चौकशीला सामोरे जाणाऱ्या उद्धव ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. एसीबी चौकशीत काय घडलं याची फोन वरून वैभव नाईक यांच्याकडून माहिती घेतली. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेलमध्ये भारतीय डायस्पोराच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अनिवासी भारतीयांच्या योगदानाचे कौतुक केले आणि भारत-फ्रान्स संबंध मजबूत करण्यावर भर दिला. पंतप्रधान मोदींनी स्थलांतरितांना भारताच्या प्रगतीशी जोडले ठेवण्याबद्दल बोलले.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जी यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
1984 च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित सरस्वती विहार प्रकरणात, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सज्जन कुमारला हत्येसह विविध कलमांखाली दोषी ठरवले आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित सरस्वती विहार प्रकरणात माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार हे आरोपी आहेत. हे प्रकरण 1 नोव्हेंबर 1984 चे आहे,
भाजपाचे आमदार सुरेश धस थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होणार आहेत. सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.
आज (12 फेब्रुवारी 2025) संध्याकाळी आदित्य ठाकरे संध्याकाळी 6 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच आदित्य ठाकरे केजरीवालांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी परळी शहरातील मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले होते. तसेच कोण पोलिस?, कशाचा बॉडीगार्ड असे म्हणत मध्ये कोणीही जायचे नाही म्हणून अंगरक्षकाला बाहेर काढले होते, तसेच कार्यकर्ते ॲड. माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड पोलिसांनी 3 महिन्यांनंतर याची दखल घेतली. या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा, मूल्ये, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भारतमातेची डिजिटल प्रतिमा देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर बसवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. तसं लेखी निवेदनही शेवाळे यांनी अमित शहांना दिलं आहे. या निर्णयाची अंलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देण्याची विनंती यामध्ये करण्यात आली आहे.
जन्मदाखला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी अमरावतीच्या अंजनगावसुर्जी येथे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल. मालेगाव, अकोलानंतर अंजनगाव सुर्जी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 27 जणांविरुद्ध दिली होती तक्रार. यातील पाच जणांची चौकशीअंती खात्री पटल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर मातोश्रीवर उद्धाव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. या भेटीविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुणे- राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर आझाद समाज पार्टीकडून आंदोलन करण्यात येत आहे. राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
गडचिरोलीत माओवाद्यांच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाला अखेरची मानवंदना देण्यात आली. ADG आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. माओवाद्यांच्या कॅम्प उध्वस्त करताना आपल्या प्राणाची आहुती नागुलवार जवानांनी दिली. शहीद झालेला जवानांचे सेवानिवृत्तीपर्यंत वेतन आणि सर्व योजनाचा फायदा कुटुंबाला देण्यात येईल.
“काल शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. संजय राऊतांनी शरद पवारांवर केलेली टीका हास्यास्पद आहे. संजय राऊत यांना व्यापक दृष्टिकोन नसेल तर हा सगळा पोरखेळ आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे महिन्यातून तीन-तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शंका घेत नाही. संजय राऊत यांनी दृष्टीत बदल करावा,” असं एनसीपीचे प्रशांत जगताप म्हणाले.
मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे. “एकनाथ शिंदेंचा दिल्लीत झालेला सत्कार हे पोटदुखीचं कारण आहे. शिंदेंचा सत्कार करावा असं पवारांनाही वाटलं असेल,” असं ते म्हणाले.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. इंद्राणी मुखर्जी यांचा परदेशवारीचा अर्ज फेटाळला आहे. सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलंय. त्याचप्रमाणे गतीने सुनावणी व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे दिले आहेत. इंद्राणीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे
महाराष्ट्रात भाजपचे 1 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण … आजचा दिवस महाराष्ट्र भाजपसाठी ऐतिहासिक… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
अजित पवारांच्या भेटीनंतर रामराजेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं आहे. काहीच दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून रामराजेंच्या बंधूंवर छापे…
चपाटा काश्मिरी गावरान मिरचीची आवक वाढली… आवक वाढल्याने मिरचीला कमी दर शेतकऱ्यांमध्ये नाराजी… दोन हजार रुपये पासून पाच हजार रुपयेपर्यंत लाल वाळलेल्या मिरचीला दर…. महिलांकडून मिरचीची खरेदी भाव वाढून मिळावा शेतकऱ्यांची मागणी..
शिंदेंना पुरस्कार का दिला याबाबत माहिती नाही… पुरस्काराचे निकष काय आहेत, याच माहिती मला नाही… साहित्य संमेलन दिल्लीत होतंय याचा उत्साह दिसतोय… असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
राहुल सोलापूरकरच्या घरासमोर सलग नवव्या दिवशी देखील पोलीस बंदोबस्त तैनात… मंगळवारी वंचित बहुजन आघाडी आरपीआयच्या वतीने करण्यात आलं होतं आंदोलन… आज ही पतितपावन संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे…राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सातत्याने होत आहे.
हेच संजय राऊत पूर्वी काय म्हणायचे. पवार साहेबांसारखा नेता राज्याला देशाला मिळाला हे भाग्य आहे. महाराष्ट्राचा सुपुत्राचा सत्कार काल झाला आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राने केला. पवार साहेबांनी काय करायला पाहिजे काय नको हे सांगण्याइतके संजय राऊत मोठे नाही, असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला.
गोसेखुर्द डॅमचे पाणी कॅनलमध्ये सोडण्यात यावे या मागणीसाठी शेतकर्यांनी कॅनलमध्ये उतरून आंदोलन केलं. गेल्या ७ दिवसांपासून ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गोसेखुर्द उजवा कालव्याच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने शेतकर्यांनी कॅनलमध्ये उतरून आंदोलन केलं.
येडशी येथील रामलिंग अभयारण्यात मागील दोन महीन्यापासुन मुक्त संचार करणाऱ्या वाघाने रेस्क्यू टिमला पुन्हा एखदा चकवा दिला आहे.विशेष म्हणजे रेस्क्यू टिमने वाघाला पकडताना पहिल्यांदाच रवीवारी राञी डार्ट गनचा वापर करून वाघाला शुट करण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेवुन वाघाने रेस्क्यू टिमला चकवा दिला.
राहुल सोलापूरकरच्या घरासमोर सलग नवव्या दिवशी ही पोलीस बंदोबस्त तैनात आहे.काल वंचित बहुजन आघाडी आरपीआय च्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.आज ही पतितपावन संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वसई विरार शहरात विविध कंपनी, राजकीय पक्षांच्या बॅनर ने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर, चौकात चारी बाजूने बॅनर लावण्यात आल्याने शहराच्या नकाशा बदलून गेला आहे. सिग्नल वरील नाक्यावर वेगवेगळे जाहिरात फलक लावल्याने अनेकवेळा वाहनधारकांना सिग्नल सुटल्याचे ही दिसत नाहीत.
जागतिक प्रेम दिन साजरा करण्यासाठी आणखी दोन दिवस असताना गुलाब फुलाच्या गड्डीचा दर ३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. २० फुलांच्या गड्डीला दर्जानुसार १५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.
कोण कोण कोणाला टोप्या घालतंय आणि टोप्या उडवतंय हेच काही कळेनास झालं आहे. दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमात शरद पवार गेल्याने, संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली.
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राहुल सोलापूरकरच्या घरासमोर सलग नवव्या दिवशी ही पोलीस बंदोबस्त तैनात आहे. वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयच्यावतीने मंगळवारी 11 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले होते. तसेच आज 12 फेब्रुवारीला पतितपावन संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सातत्याने होत आहे. राहुल सोलापूरकने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
राज्याचं राजकारण विचित्र दिशेने चाललंय. राजकारणात कोण कुणाबरोबर? हे समजणं सध्या कठीण आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाल जायला नको होतं, अशी आमची भावना आहे”, असंही संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांना मंगळवारी 11 फेब्रुवारीला महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला. दिल्लीतील या सन्मान सोहळ्याला शरद पवार आणि इतर नेते उपस्थितीत होते.
मिरा-भाईंदरमध्ये पालघर, ठाणे भागांतून प्रवेश करण्यास अवजड वाहनांना सकाळच्या वेळेत बंदी घालण्यात आली आहे.
वाहतूकीसाठी सुरु आणि बंद करण्यात येणारा मार्ग आणि कालावधी
मुंबई- अहमदाबाद वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरुन वर्सोवा बाजूकडून मुंबईकडे जाणारी जड अवजड वाहनांना सकाळी ०७.४५ वा. ते ११.१५ वाजेपर्यंत वरसावे पोलीस चौकी फांऊटन हॉटेल ते दहिसर टोल नाक्याकडे (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे व सर्व्हिस रोडवरून) तसेच ठाणे-घोडबंदर रोड मार्गे मिरा-भाईंदर शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
मुंबई-अहमदाबाद वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबई, ठाणे बाजूकडून गुजरात बाजूकडे जाणारे व गुजरात बाजूकडून मुंबई कडे येणाऱ्या वरसावे नविन पुलावर दोन्ही वाहिनीवर नो-पार्किंग.
दुपारनंतर मुंबईला जाण्यासाठी शहराच्या हद्दीत प्रवेश करण्याची मुभा दिली आहे. तसे आदेशही सुहास बावचे, उपायुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालय यांनी जारी केले.
दहिसर टोलनाक्यावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
ठाण्याहून मुंबईला जाण्यासाठी मिरा-भाईंदरमध्ये प्रवेश करण्यास अवजड वाहनांना बंदी केली आहे. यात ट्रक, कंटेनर वाहतूक करणारी वाहने, परराज्यातून येणाऱ्या मोठ्या प्रवासी बस आदी वाहनांचा समावेश आहे.
अमरावतीतील मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल पाटील यांच्याविरोधात तक्रार केली होती. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका ठेवणयात आला होता. पाटील विरुद्ध जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता. आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाज, गौण खनिजाच्या कामात अनियमितता केल्याची तक्रार पाटील यांच्याविरुद्ध करण्यात आली होती. तसेच आता राहुल पाटील यांची विभागीय चौकशीही होणार असल्याची माहिती मिळत आहे.
धाराशिव- बारावीची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर अनुपस्थित राहिलेल्या पर्यवेक्षक 10 शिक्षकावर धाराशिव मध्ये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धाराशिवचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मौनक घोष यांनी परीक्षा सुरू असताना काही परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या. मात्र त्या भेटीदरम्यान पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलेले शिक्षक गैरहजर दिसल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील २०१ किमी रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण होणार. पंचवटी, त्र्यंबकेश्वर आणि विविध भागांतील रस्त्यांच्या कामांवर भर. सिंहस्थ आढावा बैठकीत डांबरीकरणाच्या कामांचा निर्णय घेण्यात आला असून कामांची गुणवत्ता उत्तम राहील, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यवतमाळ- पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं. पुसद तालुक्यातील माळ पठार वरील सावरगाव येथील गावकऱ्यांचे आंदोलन. बेईमान सरपंच म्हणून सरपंचाच्या गळ्यात पाटी टाकून त्याला दोरीने बांधून उपविभागीय कार्यालयात आणलं.
गावात जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने गावात पाणी टंचाई आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक संजय मोरे याला कमी दृश्यमानता आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. फिटनेस न तपासता कंत्राटदाराने त्याला बस चालवायला दिल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय मोरेच्या जबाबानुसार त्याला ई-बस चालवण्याचा अनुभव नव्हता.