
गेले काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांसह कोकणामध्येही मुसळधार पाऊस कोसळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी ,वाशिष्ठी आणि काजळी या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. तर जालना जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाल्याचं पहायला मिळालं. अनेक ठिकाणी गावात पाणी शिरलं, शेतातही पाणी साचल्याने तळ्याचं स्वरूप आलंय. दुसरीकडे दक्षिण मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहील. महापालिका प्रशासनाने पालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध कामं हाती घेतली आहे. या कामांसाठी 24 तासांचा कालावधी लागण्याची शक्यत आहे. त्यामुळे आज सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10 पर्यंत ए, बी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेण्यात येणार आहे. तर काही भागांतील पाणीपुरवठा अंशत: बंद राहील.
यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
राज्यात मान्सून दाखल झाला त्यामुळे पावसाळ्यात वारंवार खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने सुरळीत विज पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी विज वितरण कंपनीच्या अभियंताला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलंच धारेवर धरले.
परभणी – हिंगोलीमधील मकोकाच्या आरोपींचा परभणीमध्ये धिंगाणा,
जिल्हा रुग्णालयातील सिस्टरला केली मारहाण,
तसेच त्यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांना भेटायला आले होते
मकोकाच्या आरोपींना परभणी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींकडून रुग्णालयातून सुट्टी दिल्याच्या कारणावरून आरोपींनी रुग्णालयात घातला धिंगाणा
आरोपींना व्हायचे होते अॅडमिट मात्र कोणताही आजार नसल्यामुळे जेलमध्ये पुन्हा पाठवणार त्यामुळे रुग्णालयातील परिचारिकेला आरोपींकडून मारहाण तसेच भर रस्त्यावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.
रुग्णालयाची केली तोडफोड
हा सर्व प्रकार जेल प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर घडला
डोंबिवलीला पावसानं झोडपलं, टिळक नगर परिसरात साचलं पाणी
एक तासाच्या पावसानं डोंबिवलीकरांचे हाल
डोंबिवलीमधील टिळक शाळा परिसरात साचले गुडघाभर पाणी
पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ
सोलापूर जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस
जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून लागल्या वाहू
मुसळधार पावसामुळे सीना नदी मोठ्या प्रमाणात पाणी
मात्र शेतकऱ्यांना बसला पावसाचा मोठा फटका
गोंदिया जिल्ह्यात आज सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धान पिकाला फटका बसणार आहे. सततच्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी हंगामात गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पीक लावण्यात आलं होतं सध्या सर्वत्र या पिकाची कापणी आणि मळणी सुरू आहेत, याचदरम्यान पाऊस सुरू असल्यानं पीक भिजण्याची शक्यता आहे.
गुरुवार पेठेतील मिर्झा मशीद ट्रस्ट, रजाशाह हॉल दर्गा, बलवार आळी जोग दर्गा, हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा येथील अतिक्रमणांवर कारवाई आणि हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असलेले शशांक हगवणे, करिष्मा हगवणे आणि लता हगवणे यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
अनधिकृतपणे चालणाऱ्या डान्सबारवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करीत ४० महिलांची केली सुटका केली आहे. माजी गृहमंत्री दिवंगत आरआर पाटील यांच्यानंतर प्रदिर्घ काळानंतर योगेश कदम एक्शन मोडवर आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे एकाचा कोयत्याने हल्ला करून निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका हॉटेलसमोर झालेल्या या खूनी हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे
बेकायदेशीर घुसखोरीविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमेत 45 रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवण्यात आली आहे. संशयितांचा शोध घेत असलेल्या पोलिसांनी सर्व लोकांचे नागरिकत्व तपासण्यास सुरुवात केली. एसएसपी अनुराग आर्य यांनी जिल्ह्यात 15 दिवसांची मोहीम सुरू केली आहे.
द्रमुकने तामिळनाडूमधून राज्यसभेसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. द्रमुकने राज्यसभेसाठी चित्रपट अभिनेते कमल हसन, कवयित्री सलमा, वकील पी विल्सन आणि एसआर शिवलिंगम यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य म्हणाले, “25 मे ते 10 जून या कालावधीत बरेलीमध्ये 15 दिवसांची मोहीम राबवली जात आहे. जर बांगलादेशी किंवा रोहिंग्या कुठेतरी बेकायदेशीरपणे राहत असतील तर त्यांची ओळख पटवून त्यांची पडताळणी केली जात आहे आणि त्यांना हद्दपार केले जात आहे. एकूण 58 पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 750 लोकांची चौकशी करण्यात आली आहे, त्यापैकी 45 लोक संशयास्पद आढळले. त्यांची पडताळणी केली जात आहे.”
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये उद्या संध्याकाळी एक मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जातील. या काळात लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले जातील.
मिठी नदी घोटाळा प्रकरणात डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी डिनो मोरिया दाखल झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी त्याची चौकशी सुरु आहे.
अहिल्यानगरमधील वालुंबा नदीच्या पुरामुळे वाळकी परिसरात जनावरांचे मोठं नुकसान झालं आहे. नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोरून त्यांची जनावरं वाहून गेली. ढगफुटीमुळे ओढवलेली आपबीती सांगताना झुंजरे वस्ती येथील शेतकरी महिलेला अश्रू आनावर झाले. अचानक पुराचे पाणी घरात शिरल्याने जीव वाचवत नागरिकांनी सुरक्षित स्थळ गाठलं पण यात घरातील सामानांचं तसेच, जनावरांचे नुकसान झालं आहे.
नाशिकमधील लासलगावमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं आहे. लासलगाव येथे मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु असलेली पाहायला मिळाली. लासलगाव बाजार समिती 51 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याची लिलाव थांबण्यात आले आहेत.
गडचिरोली स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवातही कर्जेली गावाला करावा लागतोय नाल्यातून बोटीने प्रवास. एकच पावसात कर्जेली भागातील दोन्ही नाले भरभरून वाहत आहे. कर्जेली ते देचलिपेटा जाण्यासाठी भरलेल्या नाल्यातून आपला जीव धोक्यात घालून तीन-चार फूट पाण्यातून नागरिक प्रवास करताना दिसत आहेत. कर्जेली गावाला आजपर्यंत पक्का रस्ताही नाही. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाच्या फटका बसल्याने ही परिस्थिती.
सिंधुदुर्ग – पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये कंटेनरला आग. डोझर मशीन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग लागल्याने घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पर्यायी वाहतूक भुईबावडा घाटाने वळवण्यात आली आहे.
गेले दहा ते अकरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनावरती अक्षरश: पाणी फिरवले आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
रात्रीच्या मुसळधार पावसाने अमरावती शहरातील झाडे कोसळल्याने मुख्य रस्ते झाले बंद. रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे इरविन चौक या मार्गावर झाडे पडल्याने शहरातील मुख्य रस्ता झाला बंद.
शहरातील अनेक भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर पडलेले झाडे हटवण्याचे काम सुरू
नाशिकच्या शिवाजी नगर खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून सीसीटीव्हीच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या,.
गंगापूर पोलिसांच्या पथकाने सिन्नर फाटा ते सायखेडा दरम्यान पाठलाग करून तिघांना अटक केली असून आदित्य वाघमारे, वैभव भुसारे आणि विशाल तिवारी अशी आरोपींची नावे आहेत.
आज दुपारी 12 वाजता मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी संरक्षण भिंत आणि गाळ ऊपसा प्रकरणी विधान भवनात खोली क्रमांक 701 मध्ये महत्वाची सुनावणी. आश्वासन समिती प्रमुख अध्यक्ष रवी राणा आणि 19 आमदार सदस्य यांच्यासमोर बीएमसी अधिकारी व नगरविकास अधिकारी यांची साक्ष नोंदवून घेणार सुनावणी.
पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहीत झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अमरावती, अकोला, वाशिमसह बुलढाणा जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आला आहे. मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने परिसरातील नागरिक आनंदित आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाट सह पाऊस झाला. अद्याप काही भागात पावसाची रिमझिम सुरूच आहे. मात्र वादळाने शेगाव ते संग्रामपूर रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली तर महावितरणचे अनेक पोल सुद्धा पडल्याने नुकसान झाल्याचे चित्र आहे. परिणामी या भागातील विद्युत प्रवाह काल रात्रीपासून बंद आहे.
अखेर सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या तिकीट बुकिंगला सुरुवात झाली. फ्लाय 91 कंपनीकडून आजपासून तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध. 9 जूनपासून सोलापूर ते गोवा विमानसेवेस प्रारंभ. आमदार देवेंद्र कोठे यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. सोलापूर ते गोवा विमानसेवेसाठी अंदाजे 3500 रुपयांपासून पुढे तिकिटाचे दर सुरू.
नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी महापालिकेत बैठक घेणार आहेत. स्थायी समितीच्या हॉलमध्ये 13 आखाड्यांच्या साधू महंतांची बैठक घेणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नान पर्वणीच्या तारखांची घोषणा देखील करणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील चारही मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत पडलेल्या पहिल्या पावसात मुंबईत पाणी साचलं मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहे अशी टीका भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली होती. याला आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उत्तर देण्यात आलेले आहे शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाच्या बाहेर तसेच वांद्रे परिसरात बॅनर लावलेले आहेत, ज्याच्यात आशिष शेलार यांचा उल्लेख “बाता”शिष शेलार असा केला आहे. तुम्हाला मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडलं नव्हतं तुम्ही लाथ मारून आत शिरला आहात आणि पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमच तोंड माईक मध्ये असं म्हणत शेलारंवर जोरदार टीका केली आहे.
आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पूरपरिस्थितीनंतर रेल्वे प्रशासनाकडून संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंत बांधणार असल्याचा निर्णय एमएमआरसीएलने घेतला आहे. सध्या आरे ते वरळी दरम्यानची सेवा JVLR मार्गे सामान्यपणे सुरू असून वरळीदरम्यानची सेवा तात्पुरती बंद आहे. सुरक्षा आणि कार्यक्षमता पूर्ण तपासल्यानंतरच ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे.
पुणे – शहरात कोरोनाचे 18 रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी (दि. २७) रोजी पुणे महापालिका हद्दीत 18 रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांना सौम्य स्वरूपाचा कोरोना असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर जानेवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे- सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यासाठी उद्या बंदी घातली आहे. वन विभागाकडून किल्ल्यावर जाण्यास बंदी असल्याची माहिती आहे. शहर आणि घाट परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने, सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
छत्तीसगड नारायणपूरच्या चकमकीनंतर सुकमा जिल्ह्यात 18 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. या माओवाद्यांवर एकूण 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. यात सहा माओवादी मोठे कॅडरचे आहेत. ज्यांच्यावर चकमक, खून, जाळपोळ आणि शासनाच्या नुकसान, चार भूसुरुंग स्फोटात सहभागी गुन्हे दाखल आहेत. अशा माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये सुरू असलेले ऑपरेशनच्या भीतीमुळे आत्मसमर्पण केलं आहे.
पुणे- सीबीएसई शाळा 9, तर एसएससी शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहेत. तर राज्य मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा 1 जूनपासून सुरू होणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेत परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे.
मुंबईसह राज्यात पावसाचा यलो आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काल मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करत समुद्रकिनाऱ्यांना हाय टाइडचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार दुपारच्या सुमारास समुद्रात चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्या होत्या. मात्र आज सकाळ पासून समुद्रकिनाऱ्यांवर सकाळीच ओहोटी झाल्याचं चित्र दिसून येत आहे.