
पुढील आठवड्यात परतीचा मान्सून धडकणार. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन दिवस कोकण-गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, पुढील आठवाड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याचा अंदाज आहे. सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं. शहारातील अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी यासह अनेक भागात मुसळधार पाऊस. विजांच्या प्रचंड कडकडाटासह शहरातील अनेक भागात रात्रभर तुफान पाऊस. रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागातल्या नागरी वस्तीत शिरले पाणी. लोकांच्या घरात 2-3 फूट पाणी शिरल्याने रात्री लोकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ. दरम्यान सोलापूर अक्कलकोट महामार्गवरील पंजवानी मार्केटसमोर महामार्गांवर साचले पाणी. त्यामुळे सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणी येत आहेत.
सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) आतापर्यंत नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या 35 कैद्यांना पकडले आहे. यापैकी 22 कैदी उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमेवर, 10 बिहारमध्ये आणि तीन बंगालमध्ये पकडले गेले. अधिकाऱ्यांच्या मते, ही संख्या अजूनही वाढत आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील काकोरी येथील टिकैतगंज पुलाजवळ रोडवेज बस उलटल्याच्या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेबद्दल अधिक माहितीची वाट पाहत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या म्हणजे 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना पदाची शपथ देतील.
छत्तीसगडमधील गरियाबंद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. तत्पूर्वी, रायपूर रेंज आयजी अमरेश मिश्रा म्हणाले, “गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे आणि अधूनमधून गोळीबार होत आहे. काही नक्षलवादी ठार होण्याची शक्यता आहे.”
सोलापूरकरांना दिलासा, पुराचे पाणी ओसरायला सुरुवात
तब्बल 15 तासानंतर सोलापूरच्या पूर्व भागातील पाणी ओसरले
सोलापुरातील मित्रनगर, शेळगी, दहिटणे, अक्कलकोट रोड, वज्रेश्वरीनगर आदी परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात
मुसळधार पावसाचा सोलापूरकरांना तडाखा
बीड जिल्ह्यात बॅनरवरून मोठा वाद सुरू आहे. मराठा आंदोलकांचे पोस्टर पाडल्यानंतर आज दुपारी बीडच्या पोखरी मैंदा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यानंतर आता गंगाधर काळकुटे, धनंजय गुंदेकर यांच्यासह एकुण 11 लोकांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये जोरदार पावसाची हजेरी
दमदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, धरणाच्या पाणीपातळीत वाढ
चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण भरले
धरणातून पाण्याचा विसर्ग, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबईतील मालाडमधील चिंचोली बंदर येथील गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटजवळ मध्यरात्री 3 वाजता 5 जणांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केली. कल्पेश भानुशाली असं हत्या करण्यात आलेल्याचं नावं आहे
गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटमध्ये जेवणावरून संजय मकवाना यांचे मृत कल्पेश भानुशालीशी भांडण झाले. त्यामुळे संजय मकवाना यांनी त्यांच्या 4 मित्रांना बोलावलं. मकवाना आणि त्यांच्या मित्रांनी लाथा बुक्क्यांनी भानुशाली यांनी मारहाण केली. तसेच शस्त्रांनी कल्पेश भानुशालीवर हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केलीय. तर चौघांचा शोध सुरु आहे.
ओबीसीत 1967 ला 180 जाती होत्या. मग आता 350 जाती कशा? ओबीसीमध्ये 350-400 जाती कशा घातल्या? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना उपस्थित केला आहे.
“शिंदे समितीने 2 वर्षांपासून कुणबी नोंदी शोधल्या. शिंदे समितीने अहवाल दिला म्हणजे त्यांचं काम संपलं. नोंदी शोधल्या मग हैदराबाद गॅझेट कशासाठी? नोंदी नसणाऱ्यांना ओबीसीत घालण्याचा मार्ग काढला गेला आहे. तसेच सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा झाली नाही. एका समाजाच्या दबावामुळे हा जीआर काढलाय” असं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
“मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत वकीलांशी चर्चा केली. मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा आहे. प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकता येत नाही. मराठा समाज मागास नाही असं कोर्टाने म्हटलंय. जाणूनबुजून खोटे प्रमाणपत्र दिले जात आहेत. खोटे प्रमाणपत्र जात बदलू शकत नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी मंत्र्यांना बसवून पात्र शब्द काढायला लावला. दुसऱ्या जीआरमधून लगेच पात्र शब्द हटवण्यात आला”, असं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
मुंबईतील प्रभादेवी एलफिन्स्टन पूल पाडू नये यासाठी स्थानिक नेते आक्रमक आज सर्वपक्षीय नेते तसेच प्रकल्प बाधितांची भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. भोईवाडा पोलिसांसमोर प्रकल्प बाधित तसेच सर्वपक्षीय नेते आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांची बैठक होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने १६ तारखेला रात्री पुण्यात ड्रोन शो होणार आहे.
ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिल्या पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. ओबीसींचा नुकसान होणार नाही याची आम्ही सरकारने घेतली पाहिजे असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 22,515 कुणबी नोंदी सापडल्या तर 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.
सोलापूरच्या वागदारीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. काही गावांचा त्यामुळे संपर्कही तुटला आहे.
फक्त गॅझेटच्या जीआरवरून जातप्रमाणपत्र मिळणार नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितलं. ” फक्त गॅझेटच्या जीआरवरून जातप्रमाणपत्र मिळणार नाही. प्रतिज्ञापत्रासह रक्तातील कुणबी नोंदीचा पुरावा द्यावाच लागेल.” असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.
बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले,”महाविकास आघाडी विचाराने एकत्र आली नव्हती. भाजपाला पराभूत करण्यासाठी मविआ एकत्र आली होती. पण जेव्हा जनतेनं नाकारलं म्हणून आता मविआ एकमेकांना लाथा मारतायत” अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. ” सिंदूरही खूप भावनिक गोष्ट आहे ,ती फक्त टॅगलाईन नाही. पहलगाममधील पीडितांच्या दु:खाचा विचार करा. सरकारकडून फक्त योजना आणल्या जातात पण सरकारकडे पैसेच नाहीत.” असं सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देत सरकारच्या इकॉनॉमी सिस्टमवरून टीका केली.
अक्कलकोट तालुक्यातील वागदारी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला. शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हेरफ्लो झाल्याने वागदारी परिसरातील शेती पाण्याखाली गेली.
संजय राऊत यांच्या विरोधात संजय निरुपम पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. संजय निरुपम यांचा दावा आहे की, नेपाळमधील हिंसाचार आणि सत्तापालटावर संजय राऊत यांच्या ट्विटची भाषा देशविरोधी आहे. माजी खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वर्सोवा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत निरुपम यांनी आरोप केला आहे की, संजय राऊत यांनी नेपाळमधील हिंसाचार आणि सत्तापालटावर केलेल्या ट्विटमध्ये वापरलेली भाषा लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे.निरुपम यांनी पोलिसांकडे संजय राऊत यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
आज प्रशिक्षण झालं की लगेच ग्रामीण भागामध्ये समिती काम करून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कागदपत्राची तपासणी केली जाईल. धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा – कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपञ देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.
जात प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना मराठा समाजातील भुधारक,भुमीहीन,शेतमजूर किंवा बटाईदार म्हणून जमीन शेती करत असल्याचा पुरावा सादर करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पवार यांनी दिली.
एकनाथ खडसे यांचा मी आदर करतो. विधानसभेत ज्यावेळी ते वेगवेगळ्या विषयांनी प्रश्न मांडतात त्यामुळे त्यांचा मला हेवा वाटतो, अशी स्तुती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
सरकारचा मराठा आरक्षणाविषयीचा जीआर कोर्टात टिकणार नाही. आरक्षण का मागितलं जातं यावर विचार व्हावा. मर्यादा काय हे सरकारने स्पष्ट करायला हवं असं मराठा नेते प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
“छगन भुजबळ स्वार्थासाठी ओबीसी-ओबीसी करत आहेत. सरकार आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत,” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
पुण्यात नवविवाहित सुनेसोबत शारीरिक संबंध ठेवून मूल करण्याचा प्रयत्न निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने केला. पुण्यातील सहकार नगर परिसरातील घटनेनं राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर- पश्चिम विदर्भातील दमदार पावसाने वर्धा नदीला पुन्हा पूर आला आहे. या 3 महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला जोडणारा भोयेगाव वर्धा नदी पूल सहाव्या खेपेस पाण्याखाली गेला आहे. यामुळे सिमेंट- कोळसा उद्योगांना फटका बसला आहे.
गोंदियातील 1 लाख 35 हजार शेतकरी बोनससाठी पात्र आहेत. 1 लाख 28 हजार शेतकऱ्यांना 243 कोटींपेक्षा जास्त बोनस वितरित करण्यात आला. 6 हजार 650 शेतकऱ्यांना अजून 15 कोटींचा बोनस बाकी आहे. 4 हजार 500 शेतकरी भीम पोर्टलवर ब्लॉक आहेत. सातबारा त्रुटींमुळे अडचण येत आहे. सुधारित यादी पाठवून बोनस वितरण पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे गैरहजर आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा पहिलाच दौरा असताना या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे अनुपस्थित असल्याने चर्चा सुरू झाली आहे. आमदार एकनाथ खडसे उपस्थित मात्र दुसरीकडे त्यांच्या कन्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे बैठकीला गैरहजर आहेत.
सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलंय. अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 118 मिलिमिटर इतक्या पावसाची नोंद झालीय. या अतिवृष्टीची आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून मुख्यमंत्री यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे.
जळगावात आरक्षणासाठी बंजारा गोरसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबीचे आरक्षण दिले. त्यानुसार बंजारा समाजाला एसटी सवलतीचे आरक्षण द्या या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन पोहरादेवीसमोर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.
बंजारा गोरसेनेतर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची ‘शिवतीर्थवर’ थोड्यात वेळात बैठक होणार आहे. अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धुळ्यावरून सोलापूर कडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.
गडचिरोली जिल्ह्याला सध्या मलेरिया आणि डेंग्यूने विळखा घातला आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात ५९४८ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर गेल्या तीन महिन्यांत १०२ डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेषतः गडचिरोलीच्या दक्षिण भागात १५ ते २० दिवसांत पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहेरी, भामरागड आणि सिरोंचा या तालुक्यांमध्ये नगरपंचायत प्रशासनाकडून पुरेशी स्वच्छता किंवा फवारणी न झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या वाढत्या आजारांवर नियंत्रण कसे मिळवायचे, हा एक मोठा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे.
सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. तब्बल ११८ मिलीमीटर पाऊस झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने टिपलेल्या दृश्यांमध्ये पावसाने केलेला हाहाकार स्पष्टपणे दिसत आहे. शहरातील शेळगी भागासह अनेक ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसले असून, गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचे हे भीषण रूप पाहून प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून समुद्रात पुन्हा बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली आहे. ही धमकी मिळताच मुंबई पोलीस सतर्क झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सोलापुरातील अक्कलकोट रोड परिसरातील वज्रेश्वरी नगरात रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. याशिवाय, टॉवेल, चादर आणि विडी कारखान्यांमध्येही पाच ते सहा फूट पाणी साचल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एका कारखानदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी सांगितले की नवीन रस्त्याचे काम झाल्यापासून पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याबद्दल त्यांनी यापूर्वीही महापालिकेकडे तक्रार केली होती, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे घरातील सर्व धान्य भिजले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू, शिवडी, विलेपार्ले आणि इतर ठिकाणी नाराजी नाट्य सुरू. प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्यांवर नाराजी नाट्य सुरू, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं काम वरिष्ठ पातळीवरून सुरू
मुक्ताईनगर भुसावळ रावेर यावल बोदवड या तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कारला लागवड केली आहे मात्र यावर्षी बाजारपेठेत मागणी ही कमी प्रमाणात असून त्यात उत्पन्नात ही मोठी घट झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी चिंतेत सापडला आहे त्यात निसर्गाचा संकट यामुळे उत्पन्नात घट झाली आहे गतवर्षाच्या तुलनेत 80 टक्क्याने उत्पन्न घटलं आहे त्यामुळे लावलेला खर्चही यावर्षी निघालेला नाही
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट या परिसरात झाली आहे वाहतूक कोंडी. गायमुख घाट येथून मीरा भाईंदर कडे जाणाऱ्या मार्गावर चार चाकी ट्रक टेम्पो अशा विविध वाहनांच्या लागल्यात भयामोठ्या रांगा…
नेपाळमधील राजकीय अस्थिरतेमुळे आणि हिंसक निदर्शनामुळे अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. पुणे आणि मुंबईमधील 23 जेष्ठ नागरीक नेपाळमध्ये अडकले आहेत. हे सगळे पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले होते.हे सगळे पर्यटक भयभित झाले असून गेल्या 4 दिवसांपासून नेपाळ मधील हॉटेलमध्ये अडकलेत भारत सरकारने मदत करावी आणि आम्हाला नेपाळमधून बाहेर काढावं अशी विनंती या पर्यटकाकडून करण्यात येतेय
मुक्ताईनगर भुसावळ रावेर यावल बोदवड या तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कारला लागवड केली आहे. मात्र यावर्षी बाजारपेठेत मागणी ही कमी प्रमाणात असून त्यात उत्पन्नात ही मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी चिंतेत सापडला आहे. त्यात निसर्गाच संकट यामुळे उत्पन्नात घट झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत 80 टक्क्याने उत्पन्न घटलं आहे. त्यामुळे लावलेला खर्चही यावर्षी निघालेला नाही.
ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट या परिसरात झाली आहे वाहतूक कोंडी.गायमुख घाट येथून मीरा भाईंदर कडे जाणाऱ्या मार्गावर चार चाकी ट्रक, टेम्पो अशा विविध वाहनांच्या लागल्यात भल्यामोठ्या रांगा.
महामंडळाची पुण्यात बैठक. सातारा येथील नियोजित 99 अखिल भारतीय साहेब मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षाची निवड रविवारी होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाची महाराष्ट्र साहित्य परिषद बैठक होणार असून यावेळी संमेलनअध्यक्ष पदासह संमेलनाच्या तारखांची घोषणा होणार आहे.
जालना शहरातल्या बस स्थानक परिसरात एका लॉजमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकलाय.यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्यासह 3 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं असून त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात पार पडली महत्त्वाची बैठक. बैठकीत सोसायटी रजिस्ट्रेशन, कन्व्हेयन्स, प्लॅन पास यावर झाला निर्णय. दोन आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार निर्णायक बैठक. ‘रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही महायुती म्हणून त्यांच्या पाठी उभे राहणार’ असं कल्याण ग्रामीणचे शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितलं.
बंडू आंदेकरसह साथीदारांविरुद्ध मकोका. नाना पेठेतील टोळीयुद्ध तसेच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याचा खून. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह 13 साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.
चार – पाच महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवण्याचं पोलीसांचं टार्गेट असल्याचे नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख आणि आयजी संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्यासाठी पोलीस राबवणार ॲापरेशन राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोजकेच नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात शिल्लक, त्यांनाच संपवण्यासाठी पोलिसांचा प्लान ठरला आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांची नवीन भरती बंद झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.