AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naxalist : बसवराजूच्या खात्म्यानंतर देवाच्या खांद्यावर नक्षल चळवळ, पोलिसांचाही ठरला मेगा प्लान, गडचिरोलीत काय घडणार?

Anti-Naxal Operations IG Sandeep Patil : एकीकडे नक्षली चळवळ तग धरून ठेवण्यासाठी जहाल देवा याच्या खांद्यावर चळवळीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी आता मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. काय घडणार गडचिरोलीत?

Naxalist : बसवराजूच्या खात्म्यानंतर देवाच्या खांद्यावर नक्षल चळवळ, पोलिसांचाही ठरला मेगा प्लान, गडचिरोलीत काय घडणार?
नक्षलवाद्याला चोख प्रत्युत्तर
| Edited By: | Updated on: Sep 11, 2025 | 1:00 PM
Share

माओवादी संघटन कमजोर पडत असल्यामुळे जहाल नक्षलवादी देवा याच्या खांद्यावर छत्तीसगड राज्यासह महाराष्ट्र, तेलंगाना आंध्र प्रदेश,उडीसा झारखंड अशा सहा राज्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या भागात तो दलमचं आणि पार्टीचं काम करेल. नक्षलवादी भरती करण्यापासून ते इतर कारवाया करण्यात देवाचा हात समोर आला आहे. त्याची बटालियन कमांडर म्हणून नियुक्ती होताच पोलीस अलर्ट झाले आहेत. देशातून नक्षली चळवळ समूळ उपटून टाकण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे. आता पोलिसांनी देवासह इतर नक्षलवाद्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. नक्षल विरोधी अभियानाचे आयजी संदीप पाटील यांनी नक्षल्यांना करारा जबाब देण्यात येईल असे ठणकावले आहे.

गडचिरोलीतून नक्षलवाद संपवणार

चार – पाच महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवण्याचं पोलीसांचं टार्गेट असल्याचे नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख आणि आयजी संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्यासाठी पोलीस राबवणार ॲापरेशन राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोजकेच नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात शिल्लक, त्यांनाच संपवण्यासाठी पोलिसांचा प्लान ठरला आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांची नवीन भरती बंद झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जहाल देवजीचे मोठे आव्हान नाही

नक्षलवाद्यांनी जहाल देवजी याला जनरल सेक्रेटरी बनवल्यानंतर पोलिसांचीही आक्रमक भूमिका दिसून येत आहे. बसवराजूच्या खात्म्यानंतर देवजीच्या खांद्यावर नक्षल चळवळीचा भार सोपविण्यात आला. मग पोलीसांचाही प्लान ठरला आहे. देवजीची पत्नी सृजनाक्का हिच्यावर १३१ गुन्हे होते, तिला २०२१ मध्ये पोलिसांनी मारलं. त्यामुळे गडचिरोली पोलिसांना धडा शिकवण्याचा बेडा देवजी याने घेतला होता, पण पाच वर्षांत देवजी काहीही करु शकला नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या काळात जे काही आव्हानं असतील ते गडचिरोली पोलीस पेलतील, असा विश्वासही नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी दाखवला. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येण्यास घाबरतात, त्यामुळे इथे अनेक उद्योग येत आहेत.माड आणि छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळ टिकवण्याचं देवजी समोर मोठं आव्हान आहे. स्थिती नाजूक असल्याने वेळ मारुन नेण्यासाठी नक्षलवादी शांतीवार्ताचा प्रस्ताव देतात असे पाटील म्हणाले.

राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.