AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे…. या मंत्र्याची थेट मागणी

| Edited By: | Updated on: Jan 30, 2026 | 9:29 AM
Share

Maharashtra News LIVE Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पंचतत्वात विलीन झाले. उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पावर यांचं नाव आघाडीवर आलं आहे. सध्या राष्ट्रवादीत याविषयीच्या हालचाली वाढल्या आहेत.

Maharashtra News LIVE : सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे.... या मंत्र्याची थेट मागणी

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Jan 2026 09:30 AM (IST)

    अजित पवार यांच्या आठवणीत हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर

    नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकर अजित पवार यांच्या आठवणीत भावूक झाले असून हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झाले आहेत. लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितले असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.

  • 30 Jan 2026 09:20 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात केवायसी केल्यानंतरही 58 हजार लाडक्या बहिणींचा हप्ता थांबला

    असा अहवाल राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने यवतमाळला आज पाठविला. या अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडीताईंना देण्यात आले आहेत. पुढील 4 दिवसांत याचा अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे.

  • 30 Jan 2026 09:11 AM (IST)

    सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री ही लोकांची इच्छा- नरहरी झिरवाळ

    अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात ही लोकांची इच्छा आहे..

  • 30 Jan 2026 09:06 AM (IST)

    नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात 2 फेब्रुवारीला होणार भाजपची गटनोंदणी

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेते पदी निवड होण्याची शक्यता, चंद्रशेखर शेट्टी पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून तरुण नेतृत्वाकडे पक्ष संधी देण्याची शक्यता,तर दुसरीकडे विभागीय आयुक्त रविवार पर्यंत सुट्टीवर असल्याने वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक असलेल्या 13 नगरसेवकांनी नोंदवलेल्या गटावर नोंदवलेल्या आक्षेपावर देखील आता सोमवारीच सुनावणी होण्याची शक्यता.

  • 30 Jan 2026 09:00 AM (IST)

    ३२१ पैकी १६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

    जळगाव महापालिका निवडणुक रिंगणातील ३२१ पैकी १६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३२१ उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजेच १६७ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात अपयश आले. महापालिका निवडणुकीत उभ्या बहुतांश अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. अपक्षांची संख्या मोठी असली तरी, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेसला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे.

  • 30 Jan 2026 08:55 AM (IST)

    लाल कांद्याच्या हंगामातील विक्रमी आवक

    लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या हंगामातील विक्रमी आवक आली आहे. 2 हजार 10 वाहनातून लाल कांद्याची आवक आली.  32 हजार 172 क्विंटल लाल कांदा दाखल झाला. लाल कांद्याला जास्तीतजास्त 1640 रुपये, कमीतकमी 400 रुपये तर सरासरी 1280 रुपये इतका प्रति क्विंटलला दर मिळाला.

  • 30 Jan 2026 08:45 AM (IST)

    गोंदिया शहरात चोरांची टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद

    गोंदिया शहरात चोरांची टोळी फिरत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे, तर या टोळीने एका घराची दाराची कडी कोंडा तोडून घरातून दागिने, रोख व साहित्य असा एकूण एक लाख 86 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. गोंदिया शहरातील फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीत ही घटना घडली आहे, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी देण्यात आली आहे.

  • 30 Jan 2026 08:35 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे 8 तालुक्यांना फटका

    जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गारपीट व वादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 8 तालुक्यांना फटका बसला. चोपडा, रावेर, चाळीसगाव , मुक्ताईनगर ,एरंडोल, पारोळा , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. चोपड्यात गारपिटीमुळे ५७ गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. चाळीसगावच्या ९ गावांमधील पिकांची हानी झाली आहे. जळगावच्या १७, मुक्ताईनगरच्या ६५, एरंडोलच्या १६, पारोळ्यातील २५ व धरणगावच्या ५४ गावांमधील रब्बी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे.

  • 30 Jan 2026 08:25 AM (IST)

    हिंदू जनजागृती समितीची सभा

    जळगाव शहरातील मानराज पार्क येथील मैदानावर 1 फेब्रुवारीला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने सभेत दहा हजारांहून अधिक हिंदू समाज बांधव एकत्रितपणे वंदे मातरमचे गायन करणार आहे. सभेत सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्रधर्म अध्यात्म देवता सन उत्सव बाल संस्कार यासह विविध विषयांवर ग्रंथ तसेच फलक यांचं प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सभेच्या प्रचार प्रसार तसेच जनजागृतीसाठी 31 जानेवारी रोजी शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

  • 30 Jan 2026 08:13 AM (IST)

    अजित पवारांना मदरशातील विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली

    सांगलीच्या मिरजेमध्ये मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना मदरशातील विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.मिरजेच्या मंगळवार पेठेतील ईसापुर गल्लीतील मदरशामध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं होतं,यावेळी लहान विद्यार्थ्यांनी कुराण पठण करत अजित पवारांच्या आत्म्यास शांती लाभावी,यासाठी मुस्लिम धर्मगुरूच्या उपस्थितीत प्रार्थना केली.

  • 30 Jan 2026 08:10 AM (IST)

    विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना धमकी

    विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे ५ नगरसेवक वडेट्टीवारांनी पळवून नेले होते, त्यातील ३ नगरसेवक त्या गाडीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, आम्ही ती गाडी थांबवली पण मी कोणालाही शिवीगाळ केली नाही किंवा मारण्याची धमकी दिली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. दरम्यान सध्या राष्ट्रावादीत याविषयावर खलबतं सुरू आहेत. राज्यभरात अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार या अचानक धक्क्यामुळे थंडावला आहे. सध्या अजितदादांच्या विमान अपघाताचीच चर्चा सुरू आहे. तर या अपघाताची चौकशी करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवले होते. त्यानुसार चौकशीला सुरूवात झाली आहे. लवकरच याविषयीचा अहवाल समोर येईल.

Published On - Jan 30,2026 8:10 AM

Follow us
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.