AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur: आरारारा खतरनाक, महापौर पदासाठी चंद्रपूरात धुमश्चक्री, फिल्मी स्टाईलने नगरसेवक पळवण्याचा प्रयत्न, काँग्रेसमध्ये चाललंय काय?

Chandrapur Municipal Corporation Mayor: चंद्रपूर महापालिकेत महापौर पदावरून आणि सत्ता स्थापन्यावरून वाद शिगेला पोहचल्याचे दिसते. थेट काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना पळवण्याचा प्रयत्न, त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

Chandrapur: आरारारा खतरनाक, महापौर पदासाठी चंद्रपूरात धुमश्चक्री, फिल्मी स्टाईलने नगरसेवक पळवण्याचा प्रयत्न, काँग्रेसमध्ये चाललंय काय?
चंद्रपूर महानगरपालिका, काँग्रेस, भाजपImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 30, 2026 | 9:50 AM
Share

Chandrapur Municipal Corporation Mayor: महाराष्ट्राच्या चंद्रपूरमधील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरेसवकांनाच पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अपहरणाच्या प्रयत्नाने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी संध्याकाळी नागपूरकडे जाणारी एक बस थांबवून काँग्रेस नगरसेवकाला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मास्क लावून आलेल्या काही लोकांनी हा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरण सहा लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तर एका आरोपीला अटक केली आहे. दुसरीकडे शिवीगाळ केल्याचे एक प्रकरणही समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चाललंय काय, असा सवाल केल्या जात आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक नागपूरला जात होते. ही बस वर्धा जिल्ह्यातील येलाकेली टोल नाक्यावर संध्याकाळी 5:45 मिनिटांनी थांबवण्यात आली. जवळपास 4 ते 6 वाहनांतून आलेल्या 20 जणांनी या बसला वेढा दिला. हे सर्व तरुण तोंडाला मास्क लावून आलेले होते. त्यांनी बसमधून काँग्रेसच्या नगरसेवकांनी जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही इतर वाहनातून तिथे पोहचले. दोन्ही गटात या टोलनाक्यावर धक्काबुक्की झाली. तणाव वाढताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती हाताळली.

काँग्रेसचे नगरसेवक राजेश अडूर यांच्या तक्रारी आधारे पोलिसांनी नागपूर येथील कनेन सिद्दीकी यांना अटक केली आहे. तर इतर पाच जणांची ओळख पटवण्यात आली आहे. इतर अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे समृद्धीवर नगरसेवकांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती पण समोर येत आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकांना धमकी

ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवण्यात आले आणि त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले सौरभ ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे 5 नगरसेवक वडेट्टीवारांनी पळवून नेले होते, त्यातील ३ नगरसेवक त्या गाडीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही सदर वाहन थांबवले. आम्ही कोणालाही शिवीगाळ केली नाही किंवा मारण्याची धमकी दिली नाही. उलट काँग्रेसचेच नगरसेवक आम्हाला शिवीगाळ करत असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला.

वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक हे गट स्थापन्यासाठी नागपूर येथे जात होते. त्यांना नागपूर विभागीय कार्यालयात त्यांचा गट नोंदणी करायचा होता. चंद्रपूरमध्ये महापौर पदावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांचा गट एकमेकांसमोर आला आहे. 66 सदस्यसंख्या असलेल्या या महानगरपालिकेत काँग्रेसकडे 27 जागा आहेत. तर भाजपकडे 23 जागा आहेत. बहुमतासाठी 34 हा मॅजिक फिगर आहे. ठाकरे गट हा की फॅक्टर आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.