
आर्थिक वर्ष सुरू होऊन जवळपास 3 महिने होत आले तरी जालना जिल्ह्यात बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याला गती येत नसल्याचे चित्र दिसून येतय. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 1 हजार 391कोटी रुपयाच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना देखील आतापर्यंत बँकांकडून केवळ 374 कोटी रुपये वाटप झाले असून ही टक्केवारी केवळ 21 टक्केच आहे. थकीत कर्ज वसूल होत नसल्याचे सांगत पीक कर्ज देण्यास अनेक बँका टाळाटाळ करत असल्याने शेतकरी वारंवार चकरा मारून थकले असल्याने चिंतेत आहेत. बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खते आणि बी बियाणांच्या खरेदीसाठी उसनवारी किंवा सावकाराकडे जाण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची रात्रीपासून रिप रिप सुरू झाली आणि आज सकाळी सुद्धा ती कायम आहे. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला असून अनेक शेतकऱ्यांची पिके ही सुकण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे या पावसाने त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे .
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.
हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि उबाठा शिवसेना गट आक्रमक झाले आहे. सरकारविरोधात दोन्ही पक्षांनी मोर्चाचं आयोजन केलं आहे. पण हे मोर्चे वेगवेगळ्या तारखांना नको, असं आवाहन मनसेनं केलं आहे. यासाठी उबाठा शिवसेना गटाला प्रस्ताव पाठवला आहे. तसेच आषाढी एकादशीमुळे मोर्चाचं आयोजन 5 जुलैला केलं आहे.
मुंबई घाटकोपर पूर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदीसक्ती विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. लोकांनी स्वाक्षरी मोहिमेत भाग घेतला आणि हिंदीसक्ती भाषेविरुद्ध स्वाक्षऱ्या केल्या. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 6 तारखेला होणाऱ्या आंदोलनाबद्दल मनसे कार्यकर्तेही उत्साहित आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे. आकाळकुवा तालुक्यातील बारी सुरगसमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा इमारत जीर्ण झाली आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहे. राज्यात हिंदी आणि मराठी विषयावरून वादविवाद सुरू आहे. मात्र सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या शाळांची दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात आहे. आता यावर उपाययोजना होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बुलडाण्यात मुंबई-नागपूर महामार्गावरील डोणगावाजवळ कांचनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद आहे. या पुराच्या पाण्यात काही अडकल्या आहेत. या पुराचं पाणी दुकानांसह घराममध्ये शिरलंय.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचं डोंबिवली विभागातील धोकादायक इमारतीत सुरू असलेले नागरी सुविधा केंद्र बंद करण्यात आलं आहे. पूर्व सूचना न देता अचानक नागरी सुविधा केंद्र बंद करण्यात आलं. त्यामुळे सर्वसामांन्याचे हाल होत आहेत. नागरी सुविधा केंद्र लवकरच डोंबिवलीतील पेंडसेनगर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र नागरिकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
32 हजार कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपासून पगार थकला होता. आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 301 कोटीचा निधी यासाठी मंजूर केला आहे. अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.दत्ता मुळे आणि राज्य उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर बागल यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
मीरा भाईंदरमध्ये काल मध्यरात्री दोनच्या सुमारास भामट्याने नर्मदेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील तांब्याने बनवलेली नागाची मूर्ती व इतर साहित्यांची केली चोरी. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मंदिरातील झालेल्या चोरीला 12 तास उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यावर मंदिर व्यवस्थापकांसह भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरे याने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा संपूर्ण प्रकार कसल्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला. त्याचवेळी हेमंत रासने यांनी प्रमोद कोंढरे याला समज देणे आवश्यक होते. मात्र असे काहीही घडले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
वर्ध्यातील कारंजा (घाडगे) शेतशिवारात कपाशीची लागवड सुरू असताना पाऊस आल्याने झाडाखाली थांबलेल्या दोघांवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
कुल्लू – धर्मशाला येथे ढगफुटीआणि अचानक आलेल्या पुराबद्दल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले, “राज्यात तीन ठिकाणी ढगफुटी आणि नऊ ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. कुल्लूमध्ये दोन जण बेपत्ता आहेत.
धुळे शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला आहे,सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. परंतू अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली असून वेधशाळेने पुढील 24 तासासाठी धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले जात आहे,हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी भाविक नीरा नदी किनारी दाखल झाले आहे
हिंदी सक्तीविरोधात मनसे 6 जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा निघेल. अनेक लोक बोलत असतात मोक्याच्यावेळी येत नाही. त्यात कलावंतही असतील. माझं बोलणं झाल्यावर सर्व येतील. विठ्ठलाला साकडं घालू सरकारला सुबुद्धी देवो, असे राज ठाकरे म्हणाले.
जेएनपीटीत भरती आहे. त्याच्या इंटरव्ह्यू अदानी पोर्टला सुरू आहे. काय चालू आहे महाराष्ट्रात. तुम्ही भाषेवर गोष्टी आणतात, जमिनी जात आहे, भाषा घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय चालू आहे महाराष्ट्रात, अनेक विषय महाराष्ट्राशी संबंधित त्याला सामूहिक विरोध, खासकरून हिंदीला भाषेच्या सक्तीला आहे. त्यासाठी ६ तारखेचा मोर्चा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या माणसाशी बोलणार. इतक्या दिवस मी जे बोलत होतो ना, कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. ते तुम्हाला ६ तारखेला कळेल, असे राज ठाकरे म्हणाले.
चित्रपटसृष्टीतील विशेषता मराठीतील, खेळाडूंनी उतरावं, वकिलांनी उतरावं. साहित्यिक आलेच. जे जे मराठी आहे, त्यांनी या आंदोलनात उतरावं. भाजपमधील सुद्धा अस्सल मराठी माणसांनी या आंदोलनात उतरावं. भाजपमध्ये अस्सल माणसं शोधणं हा संशोधनाचा विषय आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही हिंदीची सक्ती लागू होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
6 जुलै रोजी मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. हिंदी सक्तीविरोधात हा मोर्चा असेल. राज्यातील सर्व मराठी भाषिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. हिंदी सक्ती हे महाराष्ट्राविरोधातील कट असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
कोणत्या भाषेला विरोध नाही. कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण याचा अर्थ कोणतीही भाषा आम्ही लादून घेणार नाहीत, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
सरकार मला घाबरते अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. सरकार मला घाबरतंय, हा माझा सन्मान आहे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर इथं एका हाॅटेलमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला आहे. यामध्ये दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नंदेश्वर इथं एका छोट्या हाॅटेलमध्ये खाद्यपदार्थ तयार करत असताना गॅस पाईप लिकेज झाल्याने हा स्फोट झाला. जखमींवर सोलापुरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागात देखिल जोरदार पाऊस सुरू आहे. तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.
रात्रीपासून पुन्हा एकदा नाशिक शहर आणि परिसरात संतधर पावसाला सुरुवात झाली आहे. सोमेश्वर धबधबा परिसरात पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी झाली आहे. मात्र धबधबा परिसरात कुठेही सुरक्षा रक्षक नाही. सध्या गंगापूर धरणातून 1760 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गंगापूरसह दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50 हजार कोटींचा मलिदा सत्ताधाऱ्यांना खायचा आहे, म्हणून हा अट्टाहास आहे, असा गंभीर आरोप शेतकरी नेते राजू शेट्टींनी सरकारवर केला. “देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ या पुस्तकाचं पुन्हा एकदा वाचन करावं. बबनराव लोणीकर.. एवढा माज बरा नव्हे. हिशोब काढायचं असेल तर तुमच्या गावी येतो घोंगडे टाकून बसू आणि तुम्ही काय काय दिले ते बघू,” असाही टोला त्यांनी लगावला.
अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले. पथकासह ते अंतराळात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात शुभांशू शुक्ला स्पेस स्टेशनमध्ये दाखल होणार आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली. 30 जून ते 18 जुलैदरम्यान मुंबईत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन असेल.
धुळ्यात मुंबई – आग्रा महामार्गावरील ट्रॅव्हल्सला आग लागली आहे. महामार्गावरील देवबाणे फाट्यावर ट्रॅव्हल्सला आग लागली आहे. ट्रॅव्हल्समधील 60 प्रवासी सुखरुप असल्याची देखील माहिती मिळत आहे.
वाल्हेकर वाडी चौक येथील पेट्रोल पंपाजवळ काल मध्यरात्री दोन गाव गुंडांनी जवळपास दहा पंधरा वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या तोडफोडीत तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. मध्यरात्री नशेत असताना दोन गाव गुंडांनी वाहनांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकात दहशत निर्माण करण्यासाठी गावगुंडांनी लाठीकाठी आणि दगडाने वाहनांची तोडफोड केली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी रथाला आकर्षक फुलांची सजावट… संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी… पालखी आज बारामती मध्ये मुक्कामी…. संत तुकाराम महाराज पालखी आज बारामती मधील शारदा प्रांगणात मध्ये असणार मुक्काम… विठु नामाच्या जयघोषात वारकरी बारामती कडे मार्गस्थ…
डोंबिवली स्थानकाच्या पाचव्या प्लॅटफॉर्मवर शेड, खांब आणि तुटलेल्या लाद्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवासी संतप्त झाले असून येत्या आठ दिवसात समस्या सोडवली नाही तर रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करणार. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाला दिला इशारा.
लातूर – किरकोळ कारणांवरून दोन महिलांमध्ये वाद झाल्यानंतर, एका महिलेच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.
दुचाकीला चुकवायच्या नादात कंटेनर थेट टपरीमध्ये घुसला, जालन्यातील अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
राजुर गणपती चौफुली येथे हा अपघात घडला. कंटेनरची दुचाकीला धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार फेकला गेला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी नाही मात्र दुचाकीस्वार जखमी होऊन टपरीचं मोठं नुकसान झालं.
भाजपामधील लोकं जनतेला लाचार समजतात. पण जनता स्वाभिमानी, लाचार नाही हे लोणीकरांना समजल नाही – संजय राऊतांची टीका
जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात जून महिन्यामध्येच ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ३८.१५ टक्के झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात सजलेली नवरी मंडपात जाण्याच्या तयारीत असताना पोलीस आणि बाल संरक्षण विभागाच्या पथकाने बालविवाह थांबवला. कामठीमध्ये एका 17 वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती बाल संरक्षण पथकाला मिळाली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली.
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड पवनी कऱ्हान्डला अभयारण्यात जंगल सफारीची सुविधा एक जुलैपासून पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे वन विभागांने हा निर्णय घेतला.
श्री शेत्र शेगाव येथून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरात पोहोचली. शेगाव ते पंढरपूर असा प्रवास करत असलेल्या पालखीची 56 वर्षांची परंपरा अविरत सुरू आहे. तीन दिवस धाराशिव जिल्ह्यात पालखी असते.
ठाकुर्ली खंबाळपाडा परिसरातील ९० फुटी रस्त्यावर सुलभा चौधरी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून लंपास करत आरोपी झाले पसार. शिवमंदिर रस्ता परिसरात 63 वर्षीय हर्षला सोनवटकर या महिलेला दोन चोरट्यांनी बोलण्यात गुंतवून हातचलाखीने गळ्यातील माळ आणि हातातील अंगठी पिशवीत ठेवायला लावून दागिने केले लंपास. दोन्ही प्रकरणात एकूण दीड लाखाचा सोन्याचे ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुण्यात सर्व वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. सुरळीत वाहतुकीसाठी शहर वाहतूक विभागात मोठ्या प्रमाणात खांदेपालट. शहरातील सर्व 31 वाहतूक पोलीस निरीक्षक सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा मोठा निर्णय. सरकारी कार्यालयात वैयक्तिक समारंभ (उदा. वाढदिवस) साजरे करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्याकडून निर्बंध. कार्यालयीन वेळेत समारंभांमुळे नागरिकांच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचे कारण दिलंय. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना कार्यालयीन वेळेत वाढदिवस वा कोणतेही खासगी समारंभ साजरे करण्यास बंदी घालण्यात आली असून, अशा प्रकारांच्या तक्रारी मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश.
नाशिक येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना अनुभवता येणार हेलिकॉप्टरची सफर. ओझरहून नाशिकमधील तपोवन, त्र्यंबकेश्वर, कावनईसाठी हेलिकॉप्टरची राईड. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रयागराज प्रमाणेच नाशिकमध्ये भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यानं हेलिकॉप्टर सेवा पुरवली जाणार. एका हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी बसण्याची क्षमता, दिवसभरात हेलिकॉप्टरच्या ५० फेऱ्या. एका भाविकासाठी ओझर ते नाशिक भाडे अंदाजित ६ हजार रुपये तर त्र्यंबकेश्वरसाठी १० हजार रुपये भाडे राहण्याचा अंदाज.