Maharashtra News live : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये 3 भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू

| Updated on: May 23, 2024 | 10:16 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 23 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News live : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये 3 भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुदतपूर्व शिक्षेपासून सोडण्यास राज्य सरकारचा विरोध असून गृह विभागाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरुण गवळी उर्फ डॅडीने वयाची 65 वर्ष पूर्ण केली. 2015 सालच्या नियमाचा आधार घेत शारीरिक दृष्ट्या अशक्त असल्याने उर्वरित शिक्षा कमी करावी अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. नागपूर खंडपीठाने 5 एप्रिल 2024 रोजी गवळीची विनंती मान्य करत गृह विभागाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भिंडे याच्या विरोधात चार साक्षीदारांनी त्यांची साक्ष नोंदवली. होर्डिंग क्रॅशला कारणीभूत असलेल्या इगो मीडियाचे संचालक भावेश भिंडे यांच्याविरुद्ध चार साक्षीदारांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर आपला जवाब दिला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावत चालला आहे त्यामुळं मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट येण्याची शक्यता आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 May 2024 05:52 PM (IST)

    काँग्रेस आणि सपाची धूळधाण उडाली – अमित शाह

    उत्तर प्रदेशातील खलीलाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी 310 चा टप्पा ओलांडला आहे आणि 5 टप्प्यातील निवडणुकीत ते 400 च्या दिशेने वाटचाल करत आहेत. काँग्रेस आणि सपाची धूळधाण उडाली आहे. त्यांना (काँग्रेस) 40 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. अखिलेश बाबू, तुम्ही 2014चा टप्पाही ओलांडत नाही आहात. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे नक्की.

  • 23 May 2024 05:37 PM (IST)

    राबडी देवी मिसा भारतीच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या, भाजपवर हल्लाबोल

    बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेत्या राबडी देवी यांनी पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील आरजेडी उमेदवार मीसा भारती यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. ते म्हणाले की, देशातील जनता ठरवेल, भाजपला हवे तसे बोलता येईल. भाजप जर 400 च्या पुढे घोषणा देत असेल तर त्यांना नारे लावण्याचा अधिकार आहे. पण इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.

  • 23 May 2024 05:25 PM (IST)

    पंजाब काँग्रेसचे तीन वेळा आमदार असलेले हरमिंदर सिंग जस्सी यांनी भाजपमध्ये

    पंजाबमध्ये तीन वेळा काँग्रेसचे आमदार आणि दोन वेळा मंत्री राहिलेले हरमिंदर सिंग जस्सी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरमिंदर जस्सी हा बाबा राम रहीमचा जवळचा मित्र देखील आहे.

  • 23 May 2024 05:10 PM (IST)

    केरळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

    केरळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे तिरुवनंतपुरम, कोची आणि त्रिशूरसह प्रमुख शहरांमध्ये पाणी साचले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने केरळमधील 9 जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांना विलंब होत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे कोची बसस्थानकात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे.

  • 23 May 2024 04:08 PM (IST)

    डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई नजीकच्या डोंबिवलीतील एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये 3 भीषण स्फोट झाले आहे. भीषण स्फोटामुळे आगीचे मोठ्या लोट पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्फोटामुळे नजीकच्या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहेत.

  • 23 May 2024 04:00 PM (IST)

    बारामतीत जनता दरबार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छोटे चिरंजीव जय पवार यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार होत आहे. बारामती आणि परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर सलग दुसऱ्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 23 May 2024 03:53 PM (IST)

    पब्सविरोधात वसंत मोरे आक्रमक

    पुण्याचं पनवेल होऊ देऊ नका ,पुण्यात एवढे अनधिकृत पब्स आले कुठून? ही संस्कृती पुण्यात रुजवू नका. कल्याणी नगर अपघातानंतर वंचित बहुजन आघाडी आणि वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. शहरात वंचित बहुजन आघाडी पब्स विरोधात पथक स्थापन करणार आहे.

  • 23 May 2024 03:42 PM (IST)

    जनता आमच्या सोबत -शांतिगिरी महाराज

    या निवडणुकीत लढा राष्ट्रहिताचा,संकल्प शुद्ध राजकारणाचा हा मुख्य उद्देश आपण काम करत राहणे फळाची अपेक्षा न करता हेच केले. जनतेला आमचा विचार भावला. जनता आमच्या सोबत आल्याचा दावा शांतिगिरी महाराजांनी केला.

  • 23 May 2024 03:32 PM (IST)

    मित्रांची पण चौकशी

    पुण्यातील कार अपघात प्रकरणात वेदांत अग्रवाल याच्यासोबत पार्टीसाठी उपस्थित असलेल्या मित्राची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तपासात गरज वाटेल तशी चौकशी केली जाणार असल्याचे समोर येत आहे. मित्रांची पण चौकशी करायला सुरूवात झाली आहे.

  • 23 May 2024 03:20 PM (IST)

    जखमींवर उपचाराची सोय - देवेंद्र फडणवीस

    डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे.8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्ट करुन दिली.

  • 23 May 2024 03:10 PM (IST)

    दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजी नगर शहरात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात दुष्काळ आढावा बैठक सुरु होत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होत आहे. मंत्री गिरीश महाजनही बैठकीला उपस्थित असतील.

  • 23 May 2024 03:00 PM (IST)

    फ्लेमिंगोसाठी आमदार गणेश नाईक आक्रमक

    सीवूड्स पाणथळ या ठिकाणी फ्लेमिगो मोठ्या प्रमाणत येतात. मात्र जेट्टीने रस्ता बांधला गेल्याने पाणी या पाणथळ जागी येत नाही. आमदार गणेश नाईक यांनी या ठिकाणी पाहणी केली.आजच आम्ही रस्ता तोडतो. जेट्टी गेली डब्यात असे आमदार गणेश नाईक यांनी सिडको अधिकाऱ्यांना सुनावलं.

  • 23 May 2024 02:59 PM (IST)

    उजनी बोट दुर्घटनेतील झरे येथील चौघांवर अंत्यसंस्कार

    उजनी बोट दुर्घटनेतील झरे येथील जाधव कुटूंबियांतील चौघांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याने करमाळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

  • 23 May 2024 02:50 PM (IST)

    पी.एन.पाटील अंत्यसंस्काराला कॉंग्रेसचे राज्यस्तरीय नेते अनुपस्थित

    कोल्हापूरातील काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते अनुपस्थित असल्याचे उघड झाले आहे. निष्ठावंत नेत्याच्या अंत्यसंस्काराकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याची खंत कार्यकर्त्यांची व्यक्त केली आहे.

  • 23 May 2024 02:32 PM (IST)

    डोंबिवली एमआयडीसी कंपनीत मोठा स्फोट

    डोंबिवली एमआयडीसीमध्ये फेज- 2 सोनारपाडा जवळ पुन्हा एकदा एका कंपनीत प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे अनेक वस्तू उंचावर उडाल्या आहेत. या स्फोटातील हानी नेमकी समजू शकलेली नाही. फायर ब्रिगेडच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

  • 23 May 2024 02:29 PM (IST)

    शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल

    शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल झाले आहे. 5 जानेवारी2024 रोजी मोहोळची गोळीबारात हत्या झाली होती.

  • 23 May 2024 01:57 PM (IST)

    मुख्यमंत्री मराठवाड्यातील पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा विभागातील पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेणार आहेत.  निवडणूक आयोग यांच्या परवानगीने आणि आचारसंहिताच्या अधीन राहून बैठक घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी तीन वाजता  बैठक होणार आहे.

  • 23 May 2024 01:45 PM (IST)

    ठाकरे गटाच्या नेते निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांच्या भेटीला

    शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.  ईव्हीएम मशीन ठेवलेल्या परिसरात सुरक्षा वाढवावी.  टेक्निशियन सोबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना देखील जाण्याची परवानगी द्यावी. परिसरात संशयितरित्या लोक फिरत असल्याचा संशय आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

  • 23 May 2024 01:30 PM (IST)

    सुनील टिंगरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

    अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत मागणी केली आहे.

  • 23 May 2024 01:15 PM (IST)

    विशाल अगरवाल नरमला...

    विशाल अगरवाल नरमला. पोलीस कोठडीत चुकीची कबुली दिली. अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक झाल्याची कबुली त्याने दिली आहे.  झाल्या प्रकरणाबद्दल खंत व्यक्त केली. पोलिसांसमोर चुकीची कबुली दिली आहे.

  • 23 May 2024 12:55 PM (IST)

    निवडणूक आयोगाच्याविरोधात सजग नागरिक मंचची हायकोर्टात धाव

    महाराष्ट्रातील हजारो लोकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत. अचानक मतदार यादीतून नाव कसं काय वगळल जात. महाराष्ट्रभरातून ज्या ज्या लोकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत. त्यांनी माहिती अधिकार कायद्यातून माहिती मागवावी.

  • 23 May 2024 12:35 PM (IST)

    महामार्गावर लांबच लांब रांगा

    बेंगलोर महामार्गावरील मलकापुर येथील घटना. कराड मलकापुर येथे गॅसचा टॅकरला गळती. परिसरातील वाहतूक वळवली.

  • 23 May 2024 12:21 PM (IST)

    त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

    जळगाव शहरात जुन्या वादातून तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा निघृण हत्या केल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आठ ते दहा जण हॉटेलमध्ये प्रवेश करून तरुणाला बेगम मारहाण करताना पाहायला मिळत आहे..

  • 23 May 2024 12:07 PM (IST)

    पुणेकरांनी भाजपला मागच्या दहा वर्षात भरभरून दिल

    नगरसेवक महापौर खासदार आमदार राज्यात आणि केंद्रात भाजप हे सगळं पुण्याने दिलं. उलट भाजपने पुण्याला काय दिलं तर भाजपने पुण्याला वाहतूक कोंडी दिली भाजपने पुण्याचं पर्यावरण खराब केलं भाजपने पुण्यात अतिरेकी संस्कृती आणली, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.

  • 23 May 2024 11:50 AM (IST)

    नागपूर एम्सच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांची नियुक्ती

    नागपूर एम्सच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्रालयाने ही नियुक्ती केली आहे. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामासाठी डॉ. विकास महात्मे यांना पद्मश्री देण्यात आला आहे. एम्सकडून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास महात्मे यांनी व्यक्त केला.

  • 23 May 2024 11:40 AM (IST)

    मराठवाडयातील पाणी टंचाईची भयावह परिस्थिती लक्षात घेता आज तातडीची बैठक

    मराठवाडयातील पाणी टंचाईची भयावह परिस्थिती लक्षात घेता आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आज दुपारी तीन वाजता छत्रपती संभाजीनगर इथं ही बैठक होणार आहे.

  • 23 May 2024 11:30 AM (IST)

    ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांचा काँग्रेसला इशारा

    सांगली- ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पासूनच काँग्रेसचा आघाडीच्या उमेदवाराला विरोध होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार आहे. याचा पुरावा या स्नेहभोजनातून दिसून येतो. काँग्रेसने तात्काळ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी अन्यथा राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

  • 23 May 2024 11:20 AM (IST)

    हरणार म्हणून निवडणूक आयोगाला बळीचा बकरा केलं जातंय- नितेश राणे

    "निवडणूक आयोग आपल्या भारतात लोकशाही टिकवण्याचं काम करत आहे. हे हिरवे वळवळणारे साप आता आले आहेत. आपण हरणार हे त्यांना माहीत आहे. म्हणून बळीचा बकरा निवडणूक आयोगाला केलं जात आहे," अशा शब्दांत नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.

  • 23 May 2024 11:10 AM (IST)

    उजनी बोट दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला

    उजनी बोट दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला असून गौरव डोंगरे असं त्यांचं नाव आहे. NDRF आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने मृतदेहाला पाण्यातून बाहेर काढण्यास यश मिळालं आहे. करमाळा तालुक्यातील कुगाव उजनी जलाशयाच्या काठावर गौरव डोंगरे यांचा मृतदेह आढळला.

  • 23 May 2024 10:54 AM (IST)

    Maharashtra News : भुईमुंगांचे दर घसरले

    यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी भुईमुंगांचा उतारा घटला आहे. तसेच भुईमुगाचे दरही घसरले आहेत. गतवर्षी सात हजार रुपये क्विंटल भुइंमुगाचे दर होते. मात्र यावर्षी साडेचार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहे. यामध्ये क्विंटलमागे हजार रुपयांचीं घसरण नोंदवण्यात आली आहे.

  • 23 May 2024 10:39 AM (IST)

    Maharashtra News : बीडमध्ये कारचा अपघात, एकाचा मृत्यू

    बीड जवळील चाऱ्हाटा परिसरात भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्ता सोडून शेतात पलटी झाली. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.. दोन दिवसांपूर्वीची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. समोरून कुठलेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

  • 23 May 2024 10:21 AM (IST)

    Maharashtra News : पंकजा मुंडे यांना नोटीस

    लोकसभा निवडणूक काळातील प्रचारादरम्यान झालेल्या खर्चात तफावत आढळून आल्याने निवडून आयोगाने महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी नोटीस जारी केली आहे. तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावे, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी आदेश काढले आहेत. 3 मे ते 10 मे या कालावधीत एकूण 20 लक्ष 94 हजार 40 रुपये एवढ्या रक्कमेची तफावत आढळून आल्याने पंकजा मुंडे यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

  • 23 May 2024 10:10 AM (IST)

    Maharashtra News : केनियातील रेल्वेचे काम कोकण रेल्वेकडे

    कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तंत्रज्ञानासाठी नाव लौकिक असणाऱ्या कोकण रेल्वेच्या कामाचा डंका आता जागतिक स्तरावर गेला आहे. केनियातील रेल्वेचे काम आता कोकण रेल्वे करणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेची केनिया सरकारशी प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे.

  • 23 May 2024 09:54 AM (IST)

    Maharashtra News : बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली.

    प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली. पथकातील चारजणांसह 1 स्थानिक बुडाला. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळची घटना. SDRF पथकातील तिघांचा मृत्यू. तर दोघांचा शोध सुरू. काल दोन जण बुडाले होते. त्यातील एकाला शोधण्यासाठी बोलावले होते सकाळी SDRF चे पथक.

  • 23 May 2024 09:34 AM (IST)

    Maharashtra News : 'वर्षा प्रिंटिंग किंग' कंपनीला आग

    नागपूर हिंगणा एमआयडीसीमधील 'वर्षा प्रिंटिंग किंग' या इंक (शाई) निर्मिती कंपनीला आग. पहाटेच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन विभागाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीत कंपनी जळून राख. शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज.

  • 23 May 2024 09:33 AM (IST)

    Maharashtra News : दुष्काळसदृष्य परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिंतीत

    राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली चिंता. तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथील करा. राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती. महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्पाच मतदान संपून दोन दिवस झाले. लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळेल, त्यासाठी अटी शिथिल करण्याची मागणी.

  • 23 May 2024 09:19 AM (IST)

    Maharashtra News : ठाणे जिल्ह्यातील धरणात 40 टक्के पाणीसाठा

    मुंबईला दैनंदिन सुमारे साडेतीन हजार तर बारावी धरणातून दैनंदिन सुमारे अकराशे हून अधिक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, निवासी क्षेत्र औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा केला जातो. आता हा धरणाचा पाणीसाठा सुमारे 35 ते 40 टक्क्यांवर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील धरणे ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत शहरांना आठ महिने दैनंदिन पुरेसा पाणीपुरवठा करतील अशा प्रमाणात भरतात. यापूर्वी सारखी पाणी कपातीची वेळ शासनावर येत नाही..

  • 23 May 2024 08:49 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी २ वाजात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती पाणी टंचाईच्या मुद्यावर बैठक होणार आहे. या बैठकीत दुष्काळाच्या स्थितीबद्दलही चर्चा करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात मरावाड्याचा संपूर्ण आढावा बैठकीत घेण्यात येईल.

  • 23 May 2024 08:36 AM (IST)

    निलेश लंकेकडून आणखी एक व्हिडीओ ट्विट

    निलेश लंकेकडून आणखी एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. EVM स्ट्राँगरूममध्ये एक व्यक्ती गेल्याचा आरोप लंके यांनी केला आहे.

  • 23 May 2024 08:17 AM (IST)

    उजनी बोट दुर्घटना अपडेट, पाच जणांचे मृतदेह सापडले

    उजनी धरणातील बचावकार्य सुरू, बेपत्ता असलेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले.  मृतदेह ताब्यात घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

  • 23 May 2024 08:14 AM (IST)

    वाशीम - जहागीर गावाजवळ ट्रक आणि 108 रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

    वाशीम जिल्ह्यातील धोतरा जहागीर गावाजवळ ट्रक आणि 108 रुग्णवाहिकेचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू तर एक जखमी. नादुरुस्त असलेल्या ट्रकला ॲम्ब्युलन्स धडकली. या अपघातात ॲम्ब्युलन्समधील डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून ड्रायव्हर गंभीर जखमी आहे.

Published On - May 23,2024 8:10 AM

Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.