काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात आता ठाकरे गटाची उडी, मविआत मोठा भूकंप येण्याचे संकेत, सांगली भूकंपाचं केंद्रबिंदू ठरणार?

सांगली जिल्हा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची काय भूमिका असणार? याबाबत सांगली लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी चंद्रहार पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठा इशारा दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात आता ठाकरे गटाची उडी, मविआत मोठा भूकंप येण्याचे संकेत,  सांगली भूकंपाचं केंद्रबिंदू ठरणार?
महाविकास आघाडीत भूकंप येण्याचे संकेत, सांगली भूकंपाचं केंद्रबिंदू ठरणार? मविआत काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 4:24 PM

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणुकीच्याआधीदेखील सांगली जिल्ह्यातील जागांवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं आहेत. सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या विजयानंतर तिथल्या स्थानिक काँग्रेस पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. विशाल पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतील इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघातील गावात जावून सूचक वक्तव्य केलं. आपलं या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष असेल, असं विशाल पाटील म्हणाले. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे देखील संबंधित कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनीदेखील आपल्या भाषणातून जयंत पाटील यांना इशारा दिला. यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभांच्या जागांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात वादाची ठिणगी पडलेली आहे, असं असताना या वादात आता ठाकरे गटानेदेखील उडी घेतली आहे.

डबल महाराष्ट्र केसरी आणि लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या दोन जागा लढवणारच, अशी भूमिका चंद्रहार पाटील यांनी मांडली आहे. खानापूर-मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार, असं चंद्रहार पाटील म्हणाले आहेत.

लोकसभेतील गद्दारी पुन्हा जिल्ह्यात कराल तर राज्यात किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला. चंद्रहार पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा इशारा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिक कष्टामुळे राज्यात काँग्रेस 1 वरून 13 वर आणि राष्ट्रवादी 4 वरून 8 वर गेली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेत चांगलीच गद्दारी केली, असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला.

महाविकास आघाडीत भूकंप येणार?

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत प्रचंड वाद झाले. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केल्यामुळे सांगलीच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाला काहीच मदत केली नाही. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी तिथे बंडखोर उभा केला. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय झाला. यावरु ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. आता विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघात जावून शरद पवार गटाला इशारा दिला आहे. त्यामुळे सांगलीतल्या हालचालींमुळे महाविकास आघाडीत भूकंप येऊ शकतो. तसं घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे दूरगामी परिणाम पडतील. आगामी विधानसभा निवडणुकीचे निकाल मग काहीही लागू शकतील. तसेच या घडामोडींचं केंद्रबिंदू हे सांगली ठरेल.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....