Video : अनंत-राधिका अंबानी याचं शुभमंगल होणाऱ्या Jio World Centre ची लिफ्ट पाहीली काय? एकाच वेळी तब्बल….

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची पत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यातील माहीतीनूसार येत्या 12 जुलै रोजी हा विवाह संपन्न होणार आहे.

Video : अनंत-राधिका अंबानी याचं शुभमंगल होणाऱ्या Jio World Centre ची लिफ्ट पाहीली काय? एकाच वेळी तब्बल....
worlds largest lift in jio convention centreImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 6:57 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे. तसतशी या संदर्भातील बातम्या येऊ लागल्या आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा सध्या परदेशात क्रुझवर सुरु आहे. याआधी गुजरातच्या जामगरात तारंकाची मांदियाळी प्री-वेडींगला अवतरली होती. येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचे शुभमंगल Jio World Convention Centre मध्ये होणार आहे. त्या जिओ वर्ल्ड सेंटरच्या लिफ्टचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातील लिफ्ट जगातील सर्वात मोठी लिफ्ट असल्याचे म्हटले जात आहे. या लिफ्टचे वैशिष्ट्ये म्हणजे एकाच वेळी ती तब्बल 200 जणांना वाहून नेऊ शकते…आहे ना कमाल…

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा धाकटं रत्न अनंत अंबानी आणि उद्योगपती तसेच एन्कोर हेल्थकेअर या कंपनीचे सीईओ वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट हीच्या येत्या 12 जुलैला होऊ घातला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या विवाहाची जगभरात चर्चा सुरु आहे. कारण या विवाहाला जगातील सर्व प्रसिद्ध हस्तींची असलेली उपस्थिती…गायिका रिहाना पासून ते शकीरा यांनी या प्री – वेडींग सोहळ्याला हजेरी लावून बक्कळ बिदागी वसुल केली आहे. परंतू आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या लेकाचं लग्न आहे म्हटले की बॉलिवूडच्या मंडळींना वराती म्हणून बोलावणं तर आलंच..मग आताही ही मंडळी क्रुझवर गेली आहेत सोहळ्यासाठी युरोपला…

अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची पत्रिका व्हायरल होत आहे. त्यातील माहीतीनूसार येत्या 12 जुलै रोजी हा विवाह संपन्न होणार आहे. या विवाहाचे स्थळ बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर असल्याचे म्हटले जात आहे. याच आलिशान इमारतीत एप्पल आयफोन विक्रीचे देशातील पहिले सेंटर स्थित आहे. या Apple कंपनीच्या iPhone ची जगात चर्चा असते. आता भारतातही आयफोनची दोन स्टोअर उघडली आहेत. त्यापैकी एक सेंटर जिओ वर्ल्ड सेंटर आणि दुसरे दिल्लीत उघडण्यात आले आहे. या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये Apple च्या शोरुममध्ये नोकरी करण्यासाठी MBA झालेले विद्यार्थी देखील रांगा लावून उभे होते.

जगातील सर्वात मोठ्या लिफ्टचा व्हिडीओ येथे पाहा –

जिओ वर्ल्ड सेंटरची लिफ्ट ही जगातील सर्वात मोठी लिफ्ट म्हटली जाते. या लिफ्टमध्ये एकाच वेळी 200 जण सामावू शकतात. त्यामुळे या लिफ्ट पाहायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. या आलिशान लिफ्टचा व्हिडीओ एक्स हॅण्डल @gunsnrosesgirl3 या अकाऊंटने शेअर केला आहे. त्याला भरपूर व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ 4.7 हजार युजरनी लाईक केला आहे.

Non Stop LIVE Update
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प.
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ.
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा.
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप.
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी.
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट.
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद.
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?.