विमानातील एक सिक्रेट रुम, कोणालाच नसते माहित, फक्त हवाईसुंदरी तिथे…

विमानातून तुम्ही अनेकदा प्रवास केला असेल, परंतू विमानात सिक्रेट रुम देखील असतात हे तुम्हाला माहीती आहे. का ? काय उपयोग असतो या सिक्रेट रुमचा आणि त्या विमानात कोणत्या बाजूला असतात.

विमानातील एक सिक्रेट रुम, कोणालाच नसते माहित, फक्त हवाईसुंदरी तिथे...
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 11:03 PM

जेव्हा तुम्ही विमान प्रवास करता तेव्हा तुम्हाला तेथे प्रवाशांच्या आसनांशिवाय काही दिसत नाही. तुम्ही प्रवासात पाहीले असेल की एअर होस्टेस या बहुतांश वेळ उभ्या असतात किंवा वॉशरुम जवळील छोट्या सिटवर बसलेल्या असतात. पायलट तर कॉकपिटमध्ये असतात. मग तुम्ही कधी असा विचार केला आहे का की हे कर्मचारी आराम कसा आणि कुठे करतात. खास करुन जेव्हा विमानाचा प्रवास खूप लाबंपल्ल्याचा असतो. यासाठी हे कर्मचारी विमानातील एका सिक्रेट रुमच्या पर्यायाचा वापर करतात. ही सिक्रेट रुम असते तरी कुठे ? ती आपल्याला का दिसत नाही ?

मुंबई ते अमेरिका अशा  लांबपल्ल्याच्या विमानात खास करुन विमान कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी सिक्रेट रुम असतात असे सीएनएनच्या बातमीत म्हटले आहे.  या रुममध्ये जाऊन कर्मचारी आराम करु शकतात. या रुम अतिशय गुप्त असतात, त्यामुळे त्या प्रवाशांच्या सहज नजरेला येत नाहीत. येथे जाण्यास प्रवाशांना मनाई असते. या सिक्रेट रुममध्ये पायलट आणि एअर होस्टेस यांना आराम करता येईल अशी सोय असते. या रुममध्ये गादी, चादर आणि लाईट तसेच एसीची सोय केलेली असते.

 सिक्रेट रुममध्ये आरामाची सोय

नविन विमानात हा सिक्रेट बेडरुम मुख्य केबिनच्या वरती असतो. तर जुन्या विमानात याची जागा कॉकपिट जवळ असते. युनायटेड एअरलाइन्स फ्लाईट अटेंडेंट सुजैन कार यांनी सीएनएनशी बोलताना सांगितले की त्या बोईंग 787, 777 आणि 767 विमानातून नेहमी ड्यूटीला असतात. अनेकदा या रुमचे दरवाज्यांना प्रवासी वॉशरुमचे दरवाजे समजतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशी त्याच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. परंतू अशा वेळी आपण प्रवाशांना योग्य रस्ता दाखवितो असे सुजैन कार यांनी म्हटले आहे.

दीड तासांचा आराम

या सिक्रेट रुम अतिशय आरामदायी असतात. परंतू एखाद्याची उंची जर सहा फूट असेल तर त्यांच्या या रुम गैरसोयीच्या असतात. काही विमानात बिछाना नसतो. तेथे केवळ रिक्लायर असतात. पडदे असतात. सहा तासांपेक्षा जास्त प्रवासाच्या वेळी विमान कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वेळ आराम करण्यासाठी दिला जातो. यावेळी कर्मचाऱ्यांना काम दिले जात नाही. दीड तासांची आरामाची सुट्टी असते. परंतू सर्व एअर होस्टेसना एकाच वेळी आराम करता येत नाही. या संदर्भातील अनेक विमानप्रवाशांना माहीती नसते की अशी सिक्रेट रुम विमानात असते.

Non Stop LIVE Update
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं.
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं..
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली.
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्..
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्...
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक.
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.