
सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे विविध मुद्द्यांवरुन आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेत शिवीगाळप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधान परिषदेतील शिवीगाळीबाबत अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यामातून दिलगिरी व्यक्त केली आहे. या पत्रानंतर आज अंबादास दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे. तर दुसरीकडे टी 20 वर्ल्ड कप 2024 विजेता भारतीय संघ मायदेशी परतला आहे. टीम इंडिया दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यानंतर ते मुंबईत दाखल होणार आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची संध्याकाळी मुंबईत ओपन डेक डबल डेकर बसमधून विजयी मिरवणूक काढली जाणार आहे.
आमचे सरकार जिथे जिथे एखादा प्रोजेक्ट हाती घेतो त्या प्रोजेक्टला विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. मुंबईची झोपडपट्टी असो की कोकणचा नवीन प्रकल्प असो. विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने राज्याचा विकास जातो मात्र विरोधक त्याला विरोध करत असतात अशी टीका माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
पुण्यातील सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत ठाकरे यांच्या शिवसेनेची वाट धरली. यामुळे वंचितचे कार्यकर्ते संतापले आहेत. हडपसरच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने वसंत मोरे यांचे ऑफिस फोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मोरेबागेतील वसंत मोरे यांच्या ऑफिससमोर बंदोबस्त वाढवला आहे.
शहापूर येथील सुशांत कांबळे या युवकाचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना चार तासाच्या पोलिसांनी गजाआड केले. घोडा गाडी परत मागण्याच्या आर्थिक देवाण घेवाणीतून सुशांत ही हत्या झाली. अतिश उर्फ टक्क्या, नेटके, आर्यन चव्हाण बाळू उर्फ प्रदीप यादव अशी आरोपींची नावे आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांनी या खुनाचा उलगडा चार तासांच्या आत केला आहे.
कुणबी आरक्षणाची मागणी जरांगे पाटलांची आहे. पण, समाज सगळ्याच घटकांपासून बनला आहे. सगळ्याच समाज घटकांच्या अशा आकांक्षांचा विचार होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. संसदेत विजाती नियोजन घेण्याची मागणी केली आहे. ती सर्वांची मागणी आहे. जातीय जनगणना झाली पाहिजे. जातीय जनगणना झाली तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी फायदा होईल असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
येत्या 8 ते 10 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत.
भारतीय हवामान खात्याने कोकण आणि गोव्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. आजपासून पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरी नगरीत विसावणार आहे. मार्तंड देवस्थान समिती यावेळी भांडाऱ्याची उधळण करणार आहे. सुमारे १०१ किलोचा भंडारा माऊलींच्या पालखीवर उधळण्यात येणार आहे.
अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाच्या एका भागाचा दगड खाली पडला. मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून दगड दोन वाहनांवर पडला आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
विशालगडानंतर आता मलंगगड मुक्ती मोहीमेची सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाकडून मलंगगडवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. गडावर अतिक्रमण केलेली घरे, ढाबे, हॉटेल्स जमिनदोस्त करण्यात येत आहे. या मोहीमेत 600 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडावरील वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे.
श्री मलंगगडावर गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाकडून अतिक्रमण कारवाईला सुरुवात झाली आहे. गडावर अतिक्रमण केलेली घरे, ढाबे, हॉटेल्स जमिनदोस्त करण्यात येत आहेत. या मोहीमेत 600 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
टीम इंडिया मुंबईला पोहोचण्यापूर्वी मुंबई विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉग एस्कॉर्ट क्यूआरटी टीमशिवाय इतर अनेक पोलिस पथकेही तैनात आहेत. मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सुरक्षा रक्षकांशी चर्चा करत आहेत. टीम इंडियाच्या स्वागतासाठी पोलिसांकडून सुरक्षेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आला असून त्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या गोळीबारात अमन अंधेवार हा मनसे कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख युवक जखमी झाला आहे
सासवड – जेजुरी रस्त्यावरच्या वाळुंज फाटा या ठिकाणीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत आहे. अशातच पुढे दिंडी क्रमांक ७८ मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला होता. पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली गेली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेच्या बाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचं स्पष्टीकरण दिले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही. योजनेचा लाभ घेतांना बँक खात्यात डिपॉझिटही करण्याचीही गरज नाही. अफवा पसरवणारे, अर्ज करतांना एजंट आढळून आल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासुन अंबादास दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत. अंबादास दानवे यांनी सोमवारी विधानपरिषदेत बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती.
उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. र्ल्ड कप विजयी संघांचं 4 जुलै रोजी संध्याकाळी मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक ही नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान काढण्यात येणार आहे. डबल डेकर ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. इंडियन टीमसाठी गुजरातहून आणलेल्या बसचा त्यांनी निषेध केला आहे.
हडपसर पोलीस स्टेशन मधून आणखी एक आरोपीने पलायन केले आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचे दागिने चोरणारी महिला पोलिसांच्या ताब्यातून पळाली आहे. काल पालखी सोहळ्यात दागिने चोरताना महिलेला पोलिसांनी अटक केली होती ध्रुपदा अशोक भोसले असे पळून गेलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पोलीस ठण्यातून पलायन केले. या प्रकरणात एका महिला पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.
पुणे शहरातील चर्चेतील व्यक्तीमत्व वसंत मोरे शिवसेना उबाठामध्ये जाणार आहे. कधीकाळी राज ठाकरे यांची सोबत अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रमणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. गुरुवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे यांचा शिवसेना प्रवेशाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला.
राज्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. तर काही ओबीसी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. मुंबई हायकोर्टात याविषयी याचिका दाखल झाली आहे. त्यात राज्य सरकारने भूमिका मांडली.
लाडकी बहिण योजनेमुळे विद्यार्थ्यांचा असा ही खोळंबा झाला आहे. शैक्षणिक कागदपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तहसील कार्यालयात महिलांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
शैक्षणिक कागदपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण. लाडकी बहीण योजनेचा शैक्षणिक कागदपत्र मिळवण्यात अडथळा. लाडकी बहीण योजनेसाठी तहसील कार्यालयात महिलांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी..
गेल्या महिन्याभरात पावसाची दुसऱ्यांदा जोरदार हजेरी. मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय विनंतीनंतर घेण्यात आलाय.
सुरत नागपूर महामार्गावरील महिर फाट्यावर मेंढपाळ धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. धनगर संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको. महामार्गावर मेंढया सह महिलांसह अनेक धनगर समाज बांधवांचा रास्ता रोको, रास्ता रोको मुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा…..
नवी दिल्ली- राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पॉलिटिकल अफेअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्प/पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आणि मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
“मुंबईतील मोक्याच्या जागा अदानीला देण्याचा सरकारचा डाव आहे. उद्योगपतीला आमचा विरोध नाही, मात्र सर्वकाही अदानीकडे देण्याचा डाव आहे. ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार मुंबईत सुरू आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पंढरपूर- मंदिर समितीच्या सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मनसे पदाधिकारी शशिकांत पाटील दाखल झाले. मनसे पदाधिकारी शशिकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली. पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन संपल्याचं मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी जाहीर केलं.
“संपूर्ण मुंबई उद्योगपतींच्या घशात घातली जात आहे. तुकाराम मुंढेंनी विरोध केला म्हणून त्यांची बदली केली. मुंबईतील दुग्धविकास विभागाची जागा अदानींच्या घशात घातली. भष्ट्राचार करून मुंबई साफ केली जात आहे,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
पंढरपूर- विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी अल्टीमेटम दिला. दुपारी एक वाजेपर्यंत मनसे पदाधिकारी शशिकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागावी, अन्यथा दुपारी दोन वाजता पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार, असा इशारा त्यांनी दिला.
लाडकी बहीण योजनेला दफतर दिरंगाईचा फटका. रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी लागणार 20 ते 25 दिवस. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तहसील कार्यालयातून माहिती उघड. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं प्रमाणपत्र मिळण्यासाठी 20 ते 25 दिवसाचा लागणार कालावधी.
महायुतीमधील घटकपक्षात असलेले आमदार विनय कोरे विधानसभेसाठी 12 ते 15 जागांची मागणी करणार. दोनच दिवसात विनय कोरे जनसुराज्य पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 4 जागा मिळाव्यात अशी मागणी विनय कोरे करणार. जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांची माहिती
T20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसह टीम इंडिया PM नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. 7 लोक कल्याण मार्ग हे पंतप्रधान मोदींच निवासस्थान आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू भारतीय संघाच्या गणवेशात दिसत आहेत.
#WATCH | Delhi: Indian Cricket Team reaches 7, Lok Kalyan Marg, to meet Prime Minister Narendra Modi.
Team India with the T20 World Cup trophy arrived at Delhi airport today morning after winning the second T20I title. pic.twitter.com/fbmVpL2eWs
— ANI (@ANI) July 4, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पदाधिका-यांची मुंबईत आजपासून दोन दिवसीय बैठकांचे सत्र . विधानसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने विविध सेलच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत.
नरिमन पॉईंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आज आणि उद्या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून विधानसभेसाठी पक्षाची संघटनात्मक ताकद मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
संजय राऊत यांना स्वप्नात बोलायची सवय आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला… अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.
मुख्यमंत्री आणि ऊपमुख्यमंत्री यांना बदनाम करन्याचा प्रयत्न होतोय, विरोधक बावचाळले आहेत. जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.
दादांनी अर्थसंकल्प मांडला पण या योजना सगळ्या मुख्यमंत्री यांच्या नावाने आहेत तर त्यांची जाहिरात करावीच लागणार.
टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहचली आहे. टीम इंडिया अवघ्या काही मिनिटांपूर्वीच आयटीसी मौर्य हॉटेलमधून निघाली होती. टीम इंडियासाठी रस्ते मोकळे करण्यात आले होते. आता टीम इंडिया खेळाडू आणि पंतप्रधान यांच्यासह खास बातचीत होणार आहे. तसेच चहापानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
सातारा : सज्जनगडावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. सज्जनगड येथील बस स्टॅन्ड पासून काही अंतरावरच दरड कोसळल्यामुळे सज्जनगडाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
देशाचे पंतप्रधान सर्वात मोठे बुवा आहेत. मोदी स्वत:ला देव समजतात, विष्णूचा अवतार मानतात. पंतप्रधान भोंदूगिरीतून राजकारण करत आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा असून यावेळी गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होईल.
मोदींच्या दौऱ्यातून महायुती विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याची सूत्रांची माहिती.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा यवतमधील मुक्काम आटोपल्यानंतर हा पालखी सोहळा आज सकाळी दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्कामाकरिता मार्गस्थ झाला आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात हा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गाने आता मार्गस्थ झाला आहे.
लष्करात नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून एकाच कुटुंबातील तिघांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नोकरीसाठी 29 लाख रुपयांचे फसवणूक करण्यात आली आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संदीप गुरव याला अटक केली आहे.
धारावी पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
अकोला जिल्हातल्या पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम दिग्रस येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत विषारी अळ्यांचा पादुर्भाव आढळून आला. यामुळे पालक आक्रमक पवित्रा घेत शाळेला कुलूप ठोकले.
इचलकरंजी शहापूर येथे एका अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगडाने वार करून त्याची हत्या करण्यात आली.
सुशांत कांबळे या मुलाची हत्या झाली. शहापूर चावडीजवळील ही घटना आहे.
यवतमाळमधील पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. 12 नेत्याच्या शिष्टमंडळासह कारंजा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे. गेल्या तीस वर्षापासून बाहेरचा आमदार असल्याने स्थानिक नेत्यांना उमेदवारी द्या अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात सोमवारी बैठक पार पडणार आहे. याबद्दल विभागीय आयुक्त घेणारा आढावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या वरिष्ठांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाकडून सिंहस्थच्या नियोजनावर भर देण्यात येणार आहे. 2027 च्या कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील पाच कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचे थंडावलेले काम पुन्हा सुरु झाले आहे.
पावसाळा सुरु होताच पिंपरी-चिंचवड शहरात 5 डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. त्यातील चार रूग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर एका रूग्णावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार टाळण्यासाठी महापालिकेने पावसाळा सुरू होताच खबरदरीच्या उपाययोजना राबविल्या आहेत.