कल्याण हादरलं, गाणं लावण्यावरून दोन गटात वाद, टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण
कल्याण जवळील टिटवाळा रायते येथील एका फार्म हाऊसवर जोरदार राडा झाला आहे. गाणं लावण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, कल्याण जवळील टिटवाळा रायते येथील एका फार्म हाऊसवर जोरदार राडा झाला आहे. गाणं लावण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोर व्यक्ती हा शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आहे, त्याने आपले दोन भाऊ आणि साथिदारांसह हातोडी, दांडकं आणि हॉकी स्टिकने तरुणाला बेदम मारहाण केली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गटारी अमावस्या निमित्त टिटवाळा जवळील रायते येथील आदित्य फार्म हाऊसवर पार्टी होती. या पार्टी दरम्यान गाणं लावण्यावरून दोन गटात वाद झाला . या वादातून उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाच्या माजी शहर प्रमुखाचा मुलगा जो शिवसेना शिंदे गटाचा युवा सेनेचा पदाधिकारी आहे, त्याने आपल्या साथीदारांसह एका तरुणाला हातोडी , दांडके व हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली .
या मारहाणीत करण जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर ,हैप्पी भुल्लर , सनि भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मनि अण्णा, रमु , डॅनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींमधील विकी भुल्लर हा उल्हासनगर येथे शिवसेना शिंदे गट युवासेनेचा पदाधिकारी आहे . घटनेला तीन दिवस उलटले मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्यानं, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
टिटवाळा जवळील रायते येथील आदित्य फार्म हाऊस येथे गटारी अमावस्या निमित्त करण जाधव हे आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेले होते . रात्रीच्या सुमारास गाणे लावण्यावरून करण जाधव याचा दुसऱ्या गटासोबत वाद झाला. हा वाद पाहताच फार्म हाऊसच्या मालकाने दोन्ही गटाला फार्म हाऊस बाहेर जाण्यास सांगितले.
याच दरम्यान उल्हासनगर शिवसेना शिंदे गट युवा सेनेचा पदाधिकारी विकी भुल्लर हा आपल्या साथीदारांसह या फार्म हाऊसवर आला. करण जाधव आणि विकी भुल्लर यांच्यात पुन्हा वाद झाला . विकी भुल्लर याने आपल्या साथीदारांसह करण जाधववर हल्ला केला .विकी भुल्लर आणि त्याच्या साथीदारांनी करण जाधव याला हॉकी स्टिक, लाकडी दांडके, तसेच हातोड्याने बेदम मारहाण केली, या मारहाणीत करण जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कल्याण मधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तर याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर याच्यासह हैप्पी भुल्लर , सनि भुल्लर,मुकेश यादव,सचिन शेवाळे,मनि अण्णा,रमु ,डॅनि यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र घटनेला 48 तास उलटून गेले तरी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये.
