AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा शरद पवारांना मोठा धक्का; नांदेडमध्ये मोठी खेळी

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

अजितदादांचा शरद पवारांना मोठा धक्का; नांदेडमध्ये मोठी खेळी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2025 | 3:51 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा दणका बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील तीन्ही घटक पक्षांचे मिळून राज्यात 232  उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे.

दरम्यान पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नांदेडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई व महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीसाठी ही पक्षगळती डोकेदुखी ठरत आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये देखील मोठा धक्का बसला. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या पक्षप्रवेशापूर्वीच सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?