अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा, 5 टक्के सवलत जाहीर

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा, 5 टक्के सवलत जाहीर

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता खुल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीय. उमेद संस्थेबद्दल देखील सामंत यांनी भाष्य केले.

Yuvraj Jadhav

|

Oct 11, 2020 | 9:15 PM

रत्नागिरी:अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता खुल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीय. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उमेद संस्थेबद्दल ही सामंत यांनी भाष्य केले. (Uday Samant declared govt take decision for five percentage relief for engineering students)

बारावीला पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) या फॉर्म्युल्यानुसार खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकरता 50 टक्के आणि मागासवर्गातील विद्यार्थ्यांकरता 45 टक्क्यांची अट होती. पण, आता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के आणि मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितले. शिवाय, याचा फायदा जे विद्यार्थ्यी राज्याबाहेर जात होते, अशा जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली

आरे कारशेड कांजूर येथे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेला देखील दय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीच्या अगोदरच कारशेडबाबत लोकांना शब्द दिलेला होता. मुख्यमंत्र्यांनी लोकांना हवा असलेला निर्णय घेतला आहे. काही लोकांना चांगल्या निर्णयावर देखील टीका करावी वाटते, असा टोला उदय सामंत यांनी दरेकरांना लगावला.

उमेद या संस्थेबाबत अनेक गैरसमज होते. या संस्थेचं खासगीकरण केले जाणार असून कर्मचाऱ्यांना देखील कमी केले जाणार असल्याचं बोललं जात होतं. पण, त्यामध्ये काहीही तथ्य नसून उमेद बंद होणार नाही. केवळ कर्मचाऱ्यांच पगार हे दुसऱ्या संस्थेमार्फत काढले जातील. शिवाय, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कंत्रात नव्यानं केलेले नाही, अशांची यादी तयार केली असून त्यांचे पगार आणि कंत्राट देखील पुन्हा केले जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

संबंधित बातम्या:

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत

राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही, उदय सामंतांचा टोला

(Uday Samant declared govt take decision for five percentage relief for engineering students)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें