“छावा” चित्रपटाच्या दिग्दर्शकाला उदयनराजे भोसले यांनी लावला थेट फोन…म्हणाले की
'छावा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या नृत्याविष्कारावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनाच फोन लावून सूचना केल्या आहेत.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर बेतलेला ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. खासकरुन छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखविल्याने कोल्हापूरचे स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. हा चित्रपट इतिहास संशोधकांना आधी दाखवयला हवा होता असाही आक्षेप संभाजीराजे छत्रपतींनी घेतला होता. आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना थेट फोनच लावला असून त्यांना काही सूचना केल्या आहेत.
मराठीतील ख्यातनाम सिनेमाटोग्राफर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हिंदी चित्रपट “छावा” येत्या १४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा अभिनेता विकी कौशल याला नृत्य करताना दाखविले आहे. या चित्रपटातील दृश्यांवर इतिहास प्रेमींनी काही आक्षेप घेतले आहेत. या चित्रपटातील दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी इतिहास संशोधक आणि आमच्याशी चर्चा करायला हवी होती. तसेच चित्रपटातील काही दृश्यांना हटविण्याची मागणी त्यांनी केली होती.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘छावा ‘ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन केला. आणि चित्रपटातील छत्रपती संभाजी राजांचे लेझीम गाण्यावर असणारे आक्षेपार्ह सीन हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी संबंधित सिन हटवण्याची ग्वाही दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मण उतेकर यांना फोन करून या चित्रपटात काही आक्षेपार्ह घटना जर दाखवल्या गेल्या असतील तर त्या हटविण्यात याव्यात असे म्हटले आहे. लोकांपर्यंत चांगला चित्रपट घेऊन जावा आणि आजच्या पिढीसमोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले योगदान चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावे अशी सूचना देखील केली आहे.
लक्ष्मण उतेकर यांचा सकारात्मक प्रतिसाद
या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या काही घटना इतिहास तज्ज्ञ आणि अभ्यासक यांना हा चित्रपट दाखवावा. चित्रपटाची व्यवस्थित मांडणी करूनच हा चित्रपट रिलीज करावा जेणेकरून समाजामध्ये यावरुन वाद निर्माण होणार नाहीत असे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच दुरुस्तीसह हा चित्रपट प्रदर्शित करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

