शिवेंद्रराजेंसोबतच्या मनोमिलनावर उदयनराजेंची सूचक प्रतिक्रिया

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही राजेंमधला वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय. मात्र मनोमिलनावर उदयनराजेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. एकत्र यायचं की नाही ते बसून ठरवू, असं उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले हे आपल्या अनोख्या शैलीमुळे सर्वांना …

शिवेंद्रराजेंसोबतच्या मनोमिलनावर उदयनराजेंची सूचक प्रतिक्रिया

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही राजेंमधला वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय. मात्र मनोमिलनावर उदयनराजेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. एकत्र यायचं की नाही ते बसून ठरवू, असं उदयनराजे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले हे आपल्या अनोख्या शैलीमुळे सर्वांना ज्ञात आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांपासून राजघराण्यातील त्यांचे चुलत बंधु राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे यांच्यातील संबंधांना सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तडा गेला होता.

या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे यांनी त्यांची पत्नी वेदांतीकाराजे भोसले यांना नगराध्यक्षपदासाठी उभं केलं .मात्र ऐन वेळी उदयनराजे भोसले यांनी सर्वसामान्य महिलेला नगराध्यक्षपदी निवडून आणून राजघराण्यातील वेदांतीकाराजे भोसले यांचा मोठा पराभव केला. यामुळे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोघांच्यात मोठा कटूपणा आला होता.

यानंतर दोन्ही राजेंमधील वाद सातारा शहरातील अनेक मुद्द्यांवरुन वाढत गेले. यापैकी सातारकरांच्या चर्चेत असणारा सुरुची राडा प्रकरण. दीड ते दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोलनाक्याचा ठेका हा उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून गेल्यानंतर त्या टोलनाक्याची जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडे गेल्याने दोन राजघराण्यातील वाद उफाळून आला. हा वाद टोलनाक्यापुरता मर्यादित राहिला नाही.

शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यासमोर दोन्ही राजेंचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन भिडले होते. यामुळे कार्यकर्त्यांसह दोन्ही राजेंवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. याबरोबर सातारा शहरातील गणपती विसर्जनाच्या वादातही दोन्ही राजेंनी एकमेकांच्या विरोधात भूमिका मांडल्या होत्या. मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यातही जुनामोटार स्टॅन्ड परिसरात असणाऱ्या दारुचे दुकान हटविण्याच्या कारणातून दोन्ही राजे आमने सामने आले होते.

वाद मिटविण्यासाठी राजघराण्यातील व्यक्तींनी देखील प्रयत्न केले. मात्र याला अपयश आले. सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत.

मागील आठवड्यात कुडाळ येथील एका कार्यक्रमात प्रथमच दोघे समोरासमोर येऊन दोघांनी हसत हस्तांदोलन केले आणि शाब्दिक चिमटे काढत दोघे मार्गस्थ झाले. मात्र आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर या दोघातील वाद मिटण्याचे संकेत खुद्द शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं शिवेंद्र सिंह राजे म्हणाले. त्याचबरोबर, आमची दोन घराणी नाहीत, एकच घराणं असल्याचं स्पष्टीकरण दिलं असून मला खासदारकीमध्ये इच्छा नसल्याचं त्यांना माहिती दिली आहे, असंही ते म्हणाले.

वाद मिटण्यावर उदयनराजेंनी सूचक पवित्रा घेतलाय. “मी माझी जबाबदारी पेलू शकतो. दुसऱ्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली असती तर मी कधीच घरपोच झालो असतो. माझ्यावर खुप वाईट प्रसंग आलेत .भविष्यात एकत्र यायचे असेल तर ते बसून ठरवू, फक्त शब्द फिरवू नये” अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *