AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता उद्धव ठाकरेंचंही जय गुजरात, तो व्हिडीओ व्हायरल

एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये जय गुजरातची घोषणा दिली, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला, मात्र आता उद्धव ठाकरेंचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आता उद्धव ठाकरेंचंही जय गुजरात, तो व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 04, 2025 | 7:30 PM
Share

पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मात्र त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते जय गुजरात म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आता शिवसेनेकडून ट्विट करण्यात आला आहे.  ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ असं कॅप्शन शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेच्या ट्विटर हॅडलवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे. ‘ गुजरात पाकिस्तान आहे का ? सप्रेम जय महाराष्ट्र ! पुण्यातील गुजराती बांधवांच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ या घोषणेपाठोपाठ ‘जय गुजरात’ असेही म्हणाले. त्या मुद्द्यावर बरीच कोल्हेकुई चालू आहे. अस्तित्वातच नसलेल्या मुद्द्यावर गुद्दे मारण्याचा हा उद्योग आहे. ‘जय गुजरात’ ही घोषणा नसून पुण्याच्या उत्साही, सकारात्मक आणि उद्यमशील गुजराती बांधवांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद होती. त्याकडे तशाच नजरेने पाहायला हवे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, हे विरोधकांनी आधी लक्षात घ्यावे.

‘जय गुजरात’ म्हटल्यानंतर ज्यांना एवढा राग येतो, त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले तेव्हा त्यांचा राग कुठे गेला होता ? आज या मुद्यावरून जे टीका करत आहेत, त्यांच्या नेत्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा यापूर्वी दिलेली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ‘केम छो वरळी’ ही होर्डिंग्ज लावणारे कोण होते ? ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी प्रसिद्धिपत्रके पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करणारे कोण होते ? त्यांनी गुजराती समाजाची मते मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग केले. परंतु, आम्ही गुजरातला जन्मभूमी आणि महाराष्ट्राला कर्मभूमी मानून राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या गुजराती बांधवांची प्रशंसा केली. त्यात कुठलेही राजकारण नव्हते. गुजराती बांधवांचे कौतुक करणाऱ्यालाही विरोध करणाऱ्या, या विघ्नसंतोषी आणि स्वार्थी राजकारणाचा धिक्कार करावा तितका थोडाच आहे.

थोडा तरी उमदेपणा कुणाकडून तरी उसना घ्यावा, असा आमचा विरोधकांना सल्ला आहे. पण जिथे-तिथे राजकारण कालवण्यात धन्यता मानणाऱ्या विरोधकांना कोण समजावणार ? त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे उरले नाहीत, कार्यकर्ते नाहीत, पक्षही संपत चालल्यामुळे पराचा कावळा करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही गुजराती बांधवांचा द्वेष केला नाही की त्यांना आपले शत्रू मानले नाही. जो देशाशी किंवा महाराष्ट्राशी द्रोह करतो, तो शिवसेनेचा शत्रू. मग तो कोणत्याही प्रांताचा, धर्माचा किंवा जातीचा असो. पुण्यातील गुजराती समाजाने व्यापारात योगदान दिले आहे. तेथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले गुजरात भवन, जयराज क्रीडा संकुल हे पुण्याच्याच लौकिकात भर घालणारे आहेत.

पुण्यातच कशाला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गुजराती समाज पसरला आहे आणि आपल्या स्वभावधर्माला जागून त्यांनी व्यापारधर्म वाढवून राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावला हे वास्तव आहे. हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि मराठी आमचा श्वास आहे, हे मी वारंवार सांगितले आहे. आमची नाळ ही मराठी माणसाशी जोडलेली आहे. ती कुणी कितीही प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. आम्ही स्वकर्तृत्वावर निवडणूका जिंकू शकतो. त्यासाठी अशा मुद्यांचं राजकारण करण्याची गरज आम्हाला नाही. गुजरात हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी गुजराती बांधवांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे विष सध्या कालवले जात आहे. त्यापासून सर्वांनीच सावध राहिले पाहिजे. यामुळे महाराष्ट्राचीच प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर मलिन होते, याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असं ट्विट शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.