उद्धव काकांचं ऐकणार की नाही? आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय? मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन

पुण्यातील एका चिमुकलीला तिची आई अंतर न पाळण्याचे उद्धव काकांचं ऐकणार की नाही? म्हणून विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Uddhav Thackeray call 3 year old child of Pune).

उद्धव काकांचं ऐकणार की नाही? आईचा चिमुकलीला दम, तर शिवसैनिकांना का त्रास देताय? मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन

मुंबई : सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फिजीकल डिस्टन्सिंगसह स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. अगदी आई-वडिल देखील आपल्या मुलांना याबाबत सजग करत आहेत. असंच एक पुण्यातील उदाहरण समोर आलं आहे. पुण्यातील एका चिमुकलीला तिची आई अंतर न पाळण्याचे उद्धव काकांचं ऐकणार की नाही? म्हणून विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Uddhav Thackeray call 3 year old child of Pune). विशेष म्हणजे हा व्हिडीओ थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या चिमुकलीच्या वडिलांना कोण करत आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता असा प्रेमळ जाब विचारला आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन विचारणा केल्याने या कुटुंबाला मोठा सुखद धक्का बसला.

पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये विश्रांत सोसायटी येथे शिंदे कुटुंब आहे. त्याच्या घरात अंशिका नावाची त्यांची 3 वर्षाची मुलगी आहे. तिची आई तिने या काळात स्वच्छता आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सांगताना व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा लळा असल्याचं दिसतं. ही चिमुकली आपल्या आईला पुन्हा नियम मोडणार नाही, पण उद्धव काकांना माझी तक्रार करु नको, अशी विनंती करताना दिसत आहे. असं करताना तिच्या डोळ्यात पाणीही आल्यानं अनेकजण भावनिक झालेले पाहायला मिळाले.


या व्हिडीओत अंशिकाला तिची आई लॉकडाऊनचे नियम का मोडलेस असं विचारते. त्यावर ही चिमुकली मला नियम पाळायचे होते, पण माझ्याकडून चुकून मोडल्याचं सांगते. तसेच पुन्हा अशी चूक करणार नाही, असं रडतरडत आश्वासन देते. यावर आई तिला नियम पाळणार की मोदी आणि उद्धव काकांना सांगू असं विचारते. त्यावर ती उद्धव काकांना सांगू नको असं म्हणते. विशेष म्हणजे तुला उद्धव काका आवडतात का आणि किती असं आईने विचारले. त्यावर ही चिमुकली मला उद्धव काका खूप आवडतात असं सांगते. तसेच तिने उद्धव ठाकरे यांना घरी येण्याचंही निमंत्रण दिलं. याचीच दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंशिकाचे वडिल अमोल शिंदे यांना फोन करुन संवाद केला.


“आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता, तुमची तक्रार आली आहे”

चिमुकल्या अंशिकाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमोल शिंदे यांना फोन करुन आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता असा प्रेमळ जाब विचारला. तसेच तुमची तक्रार आमच्याकडे आली असून आमच्या शिवसैनिकाला त्रास देऊ नका असं सांगितलं. या चिमुकलीचं प्रेम पाहून उद्धव ठाकरे यांनी अंशिकाला आपला शिवसैनिक अशी उपाधी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या चिमुकलीशी पण गप्पा गेल्या. त्यात अंशिकाने पुन्हा एकदा मला तुम्ही खूप आवडतात असं सांगितलं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी अंशिकाला तुला कोण त्रास देतं, आई त्रास देते का असं विचारलं. त्यावर तिने आई त्रास देत नसल्याचं म्हणत आपल्या आईचा बचावही केला.

एकूणच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या चिमुकल्या चाहतीचा व्हिडीओ आणि तिचं त्यांच्यावरील प्रेम दाखवणारा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या निमित्ताने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सर्वसामान्य नागरिकांशी असलेल्या विश्वासाच्या नात्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा :

Remdesivir Injection | कोरोनावर प्रभावी Remdesivir इंजेक्शन राज्य सरकार खरेदी करणार, काय आहे रेमडेसीवीर इंजेक्शन?

राज्य सरकारने आर्थिक मदत करुन दुकानं बंद ठेवण्यास सांगावं, सलून व्यवसायिक आक्रमक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉर्म होम’, मेल आणि व्हॉटसअ‍ॅपद्वारे काम करणार

Uddhav Thackeray call 3 year old child of Pune

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *