AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारच्या शेतकरी पॅकेजचं समर्थन करतो, फक्त अट … उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

Uddhav Thackeray criticism to government : हंबरडा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, दिवाळीनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मी भेटणार आहे.

फडणवीस सरकारच्या शेतकरी पॅकेजचं समर्थन करतो, फक्त अट ... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
Uddhav Thackeray
| Updated on: Oct 11, 2025 | 2:27 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा निघाला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , संजय राऊत यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाचे नेते या मोर्चात सहभागी झाले. मोर्चामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्हाला कर्जाचं पुनर्गठन नको. आम्हाला कर्जमाफी पाहिजे. मला अधिकार आहे. मी बोलणारच. मुख्यमंत्री असताना मी कर्जमुक्ती दिली होती. मी तुम्हाला अटीतटीत अडकवलं नव्हतं. फक्त अंगठा दिला की तुम्हाला कर्ज दिलं.

आम्हाला कर्जमाफी पाहिजे, मला बोलण्याचा अधिकार

नियमित कर्ज फेड करणाऱ्या व्यक्तीला 50 हजार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण कोरोना आला. दीड वर्ष देता आले नाही. खोकेवाल्यांनी सरकार पाडलं. त्यामुळे मी देऊ शकलो नाही. सरकार गेलं. आमचं सरकार असतं तर कर्जमुक्ती करून दाखवली असती. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे. पण एक अट आहे. जीवन उद्ध्वस्त झालं. रब्बी पिक खरडून गेलं.

सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार पण माझी एक अट

50 हजार मागत आहोत. जमिनीची हालत पाहा. मुख्यमंत्री म्हणाले, खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून साडे तीन लाख देऊ. दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकाच. बाकीचं नंतर बघू असेही त्यांनी म्हटले आहे. फडणवीस सरकारच्या शेतकरी पॅकेजचं समर्थन करतो. मात्र, माझी अट आहे, असे म्हणत सरकारची फिरकी घेताना उद्धव ठाकरे दिसले.

दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

उबाठा गटाने आयोजित केलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने लोक दाखल झाले. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, दिवाळीनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी मी भेटणार आहे. शेतकऱ्यांना भेटून मदत मिळाली की, नाही हे देखील पाहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. नुकताच सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केली. मात्र, यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला टार्गेट केले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ