AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंची सरकारला घाम फोडणारी मोठी घोषणा, टेन्शन वाढलं

अतिवृष्टीचा मोठा फटका यंदा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे, शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही अत्यल्प असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा पार पडला.

छत्रपती संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंची सरकारला घाम फोडणारी मोठी घोषणा, टेन्शन वाढलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 2:57 PM
Share

राज्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे, मराठवाड्यात तर पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, सरकारकडून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी पॅकेजी घोषणा देखील करण्यात आली आहे, मात्र हे पॅकेज अतिशय कमी असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे, या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा पार पडला, या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती, या मोर्चात बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या मदतीवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही धार्मिक भावनेवर राजकारण करत आहात. लोकांचा जीव चालला आहे,  त्यावर काहीच करत नाहीत. विरोधी पक्षनेतेपद नसलं तरी, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी आलाच पाहिजे.  आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. अधिकारी आला नाही तर शेतकऱ्यांचा आसूड काय असतो तो दाखवला पाहिजे. तुम्ही बाबूगिरी करू नका. शिवसेना पॅकेजवर लक्ष ठेवेल, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दिवाळीच्या आधी पॅकेज द्या. मी दिवाळीनंतर महाराष्ट्रात फिरणार. प्रत्येकाला पैसे मिळाले की नाही हे बघेल. हाच शिवसेनेचा कार्यक्रम असेल. आम्ही गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पॅकेज मिळवून द्यायला तयार आहोत.  मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत, एकाने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी म्हटलं मला फक्त आशीर्वाद द्या. मला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडत नाहीत, पद नसताना शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलीय. निवडणूक येईल आणि जाईल, पण जीव गेला तर मिळणार नाही. अस्मानी आणि सुल्तानी संकट आलं आहे. अस्मानी संकट हातात नाही, पण सुल्तानी संकटाचा सामना करणं आपल्या हातात आहे. आपण या संकटाचा सामना करू, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, सरकारने आता जे पॅकेज जाहीर केलं आहे, ते फसवं पॅकेज आहे, असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा