AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंच्याच काळात हिंदी सक्तीची झाली… देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis : आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्याच काळात हिंदी सक्तीची झाली असा गौप्यस्फोट केला आहे.

उद्धव ठाकरेंच्याच काळात हिंदी सक्तीची झाली... देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
Fadnavis vs Thackeray HindiImage Credit source: X
| Updated on: Jan 12, 2026 | 10:29 PM
Share

महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तास उरले आहेत. आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी विरुद्ध हिंदीच्या वादावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात हिंदी सक्ती झाली असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. आजच्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

देवेंद्र फडणवीस यांनी मराठी विरुद्ध हिंदीच्या वादावर बोलताना म्हटले की, ‘महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात फक्त मराठी सक्तीची आहे. त्रिभाषा सूत्रातही सक्तीची मराठी केली. इतर भाषा शिकण्याची मुभा आहे. हे गजनी लोक आहेत. हे विसरले. एकदा क्रोनोलॉजी सांगतो. या राज्यात हिंदी सक्ती करणारे कोण. राज ठाकरे तुम्हीही ऐकून घ्या. 21 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. त्रिभाषा समिती स्थापन करतो. 16 ऑक्टोबर 2020 ला माशेलकर समिती झाली. या समितीत उबाठाचे उपनेते विजय कदम होते. समितीच्या 18 पैकी 16 मराठी होते.

उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती केली – फडणवीस

14 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरेंना अहवाल दिला. अहवाल घेताना भोंगेश्वरही उपस्थित होते. अहवालाचा पृष्ठ क्रमांक 56 वर भाषे करता उपगट केला. त्याचा अहवाल त्यात आहे. त्या उपगटातही विजय कदम होते. त्यातील शिफारस काय आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. हा उद्धव ठाकरेंचा अहवाल आहे. पहिली ते 12 विद्यार्थी इंग्रजी शिकत असतील तर त्याला हिंदी शिकवली पाहिजे. त्यांना भाषेची जाण येईल. कदम चुकले असतील. हा अहवाल 14 सप्टेंबर 2021 ला सादर झाल्यावर 20 जानेवारी 2022 ला उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला. त्याला मान्यता दिली. म्हणजे 1 ली ते 12 वीपर्यंत हिंदी सक्ती करण्याची मान्यता उद्धव ठाकरेंनी दिली.

खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत…

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘हिंदी सक्ती करण्याला मान्यता एकनाथ शिंदे किंवा मी नाही दिली. सात दिवसानंतर परत बैठक होते. मिनिट वाचून दाखवले जातात. त्या मिनिटालाही उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली. त्यावर उद्धव ठाकरेंची सही आहे. आपणच हिंदी सक्तीची करायची. आमचं सरकार आलं. आम्ही त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही सांगितलं हिंदी शिका. सर्व उपलब्ध आहे. आम्ही कोणतीही भाषा शिकायची परवानगी असेल तर आम्ही परवानगी दिली. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहे.’

पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन.
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान.
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका.
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात....
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात.....
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.