AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर उद्धव ठाकरेंकडून पक्षातील त्या बड्या नेत्याची हकालपट्टी

पक्षात भूकंप होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातील त्या बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. दोन दिवसांपासून या नेत्याच्या नाराजीची चर्चा रंगली होती. आज अचानक या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याच जाहीर करण्यात आलं.

अखेर उद्धव ठाकरेंकडून पक्षातील त्या बड्या नेत्याची हकालपट्टी
| Updated on: Jun 04, 2025 | 12:13 PM
Share

नाशिक जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांनी काल मनातील नाराजी, खदखद बोलून दाखवली होती. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आलेले, त्यावेळी बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी काल गौप्यस्फोट केला होता. आज ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली.

सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीसंबंधीत आज सकाळी संजय राऊत यांनी काही वक्तव्य केली होती. “एखाद-दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली, म्हणून संपूर्ण शिवसेनेत फाटाफूट आहे. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याइतपत प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते” असं संजय राऊत म्हणाले होते. “आज पक्ष अडचणीत आहे. लोकांना लाभ हवे आहेत. त्या लाभासाठी लोक पक्ष बदलत आहेत. कोणत्या महान विचाराने कोणी पक्ष सोडला असेल तर माल सांगाव. सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

काल सुधाकर बडगुजर काय म्हणालेले?

“मीच नाही, तर पक्षात 10 ते 12 जण नाराज आहेत. संजय राऊत यांच्यावर नाराजी नाही. पक्ष संघटनेत बदल करतांना विश्वासात घेतले नाही म्हणून नाराजी आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत” असं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं होतं. “पक्षासाठी एवढं काम केलं. आम्ही वातावरण बदलवून खासदार निवडून आणला. याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितलं. अनेकदा सुधारणा करावी अशी मागणी केली. पण अजून काही बदल दिसत नाही. विलास शिंदेंची इच्छा होती, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा. पण तसे झाले नाही. माझी नाराजी स्वतःवर आहे” असं सुधाकर बडगुजर म्हणाले होते.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी