AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

नुकतंच ऑपरेशन टायगर झालं आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानातून प्रवास पहायला मिळत आहे.

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग
फडणवीस, ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 26, 2026 | 7:11 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.  शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पक्षातील 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या सर्व खासदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे, मात्र त्याचवेळी भाजपावर ठाकरे गटाकडून टीका करणं टाळलं जात असल्याचं देखील दिसून येत आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने प्रवास केल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईहून नागपूरला रवाना होणाऱ्या विमानात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तादोंलन देखील केलं आहे.

इंडिगोच्या विमानातून दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला आहे. यावेळी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी हस्तादोंलन केलं, तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस देखील केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेते देखील उपस्थित होते. दरम्यान आम्ही तिघं भेटलो हीच मोठी बातमी आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विमान प्रवासावर दिली आहे.

मुंबईवरून नागपूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवास केला आहे. इंडिगोच्या विमानानं त्यांनी एकत्र प्रवास केला. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांची विचारपूसही केली. एकीकडे नुकतंच ऑपरेशन टायग झालं आहे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटले आहेत,  तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केल्यानं आता चर्चेला उधाण आलं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा