Operation Tiger पार्ट 2, ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या रडारवर, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गिरीश गायकवाड : राज्यात नवरात्रीआधी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे शिंदे गटाने मुंबईच्या महापौरपदासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यानंतर आता शिंदे गट हे ठाकरेंचे आमदार देखील फोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही महिन्याआधी ठाकरेंचे 6 खासदारांनी शिंदे गटाला साथ दिली. आता आमदार साथ सोडणार असल्याचा दावा करण्यात आल्याने ठाकरेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंचे १४ आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली आहे. यापैकी ५ आमदारांना सरकार मध्ये चांगली खाती आणि मंत्रिपदे हवी आहेत, अशी माहिती मिळत आहे. तर काहींची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्यावर पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्ष प्रवेश झाल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
