AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपवली, ते राज ठाकरेंचा फक्त…; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

येत्या ५ जुलैला झालेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत, हिंदी सक्तीचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नांबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपवली, ते राज ठाकरेंचा फक्त...; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
uddhav thackeray raj thackeray ramdas kadam
| Updated on: Jul 04, 2025 | 1:19 PM
Share

येत्या ५ जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा पार पडला. या विजयी मेळाव्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या मेळाव्यावर आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. आता रामदास कदम यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत ठाकरे बंधूंच्या एकजुटीवरच शंका उपस्थित केली. “हिंदी सक्तीच्या विरोधात विजय जल्लोष कसला साजरा करताय. हिंदी सक्ती उद्धव ठाकरे यांनी केली”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“मुंबईतील सोसायट्यांमध्ये जेव्हा मराठी माणसांना मांस खाण्यास मनाई केली जाते, तेव्हा हे लोक कुठे जातात, असा सवाल रामदास कदम यांनी विचारला. मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे त्यांचे सरकार होते, त्यांनी मराठी माणसांसाठी काय केले? मराठी माणूस गिरगाव, दादर येथून अंबरनाथ-कल्याण येथे गेला. आता मुंबईत मराठी माणूस फक्त १७ टक्के उरला आहे. जेव्हा दोन जिल्ह्यांची, पुणे आणि नाशिकची मागणी केली होती, तेव्हा नाही जमले, आता का वाटी घेऊन हात पसरवतात?” असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही

“उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे. त्याचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे. राज ठाकरेंनी जरा समजून जपून पुढचा विचार करा असा सल्ला रामदास कदम यांनी दिला. तुम्हाला फक्त उद्धव ठाकरे वापरून घेतील. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाला नाही, तुमचा कसा होणार?” असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला.

शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केला

“मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, तर उद्धव ठाकरे पुन्हा काँग्रेसकडेच जातील. मनोहर जोशी यांना लाखो लोकांसमोर मंचावरून खाली पाठवले, रावतेंना काहीच दिले नाही. शेवटी, शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे कोणाचा भाऊ होऊ शकत नाही. पळ मेल्यानंतर शेवटी वावळतोय,” अशा बोचऱ्या शब्दांत कदम यांनी टीका केली. रामदास कदम यांच्या या विधानांमुळे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या टीकेला ठाकरे बंधू कसे प्रत्युत्तर देतात”, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.