AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला वाटलं हा वाघ, निघाला लांडगा, उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर सडकून टीका; म्हणाले तिकीटच दिले नसते!

खंडोची खोपडे, सूर्याजी पिसाळ यांचे नाव घेतल्यावर तुम्ही गद्दार म्हणता. आता चारशे वर्ष झाली त्या दोघांच्या कपाळावरचा डाग पुसला गेला नाही. मला सोडून गेलेल्या खासदारांच्या कपाळावरचा डाग कसा पुसला जाणार, असा बोचरा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

मला वाटलं हा वाघ, निघाला लांडगा, उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर सडकून टीका; म्हणाले तिकीटच दिले नसते!
uddhav thackeray and omraje nimbalkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2026 | 6:49 PM
Share

Uddhav Thackeray : ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ही बंडखोरी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या जिल्ह्यात जाऊन ठाकरे झंझावाती सभा घेत आहेत. या सभांना शिवसैनिक, सामान्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच त्यांनी धाराशीव मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर घणाघाती हल्ला केला. मला ओमराजे यांचे कारनामे माहिती असते तर मी त्यांना उमेदवारीच दिली नसती, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी तुमची माफी मागतो

ओमराजे यांची एक-एक प्रकरण समोर येत आहे. मला हे अगोदर माहिती असतं तर मी ओमराजे यांना कधीच उमेदवारी दिली नसती. आता त्यांची भयानक प्रकरणं समोर येत आहेत. असा माणूस आपण कसा पोसला? असा प्रश्न आता मला पडतो. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. मी त्यांना उमेदवारी दिली नसती तर तुम्ही त्यांना मतं दिली नसती. ही कीड वाढलीच नसती, अशी टीका उद्धव टाकरे यांनी केला.

मराजे निंबाळकर वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा

खंडोची खोपडे, सूर्याजी पिसाळ यांचे नाव घेतल्यावर तुम्ही गद्दार म्हणता. आता चारशे वर्ष झाली त्या दोघांच्या कपाळावरचा डाग पुसला गेला नाही. मला सोडून गेलेल्या खासदारांच्या कपाळावरचा डाग कसा पुसला जाणार. मला ओमराजे यांचा अभिमान होता. परभणीत माझा एका बाजूला खासदार होता, दुसऱ्या बाजूला आमदार होता. धाराशीवमध्येही असेच चित्र होते. एका बाजूला कैलास होते तर दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर होते. हे दोन वाघ आहेत, असे मी म्हणायचो. परंतु ओमराजे निंबाळकर हे वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा होता, हे मला तेव्हा दिसलं नाही, असे म्हणत त्यांनी धाराशीवच्या मतदारांची माफी मागितली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर ओमराजे आता नेमके काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल