AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare : थुंकून चाटायची जी सवय आहे, ती…सुषमा अंधारे यांची जहरी टीका

"शेकडो कोटी रुपये कमवल्यानंतर सुद्धा आपल्या भावाच्या विधवेला वीस कोटी रुपये देणं होत नाही. भिकार मानसिकता असणाऱ्या फुके यांनी असे विनाकारण शब्द फुकू नये" अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Sushma Andhare : थुंकून चाटायची जी सवय आहे, ती...सुषमा अंधारे यांची जहरी टीका
Sushma Andhare
| Updated on: Oct 03, 2025 | 1:33 PM
Share

कालच्या भाषणात उद्धव ठाकरे हे शिंदेंना खिजगणतीतही धरत नव्हते. तिथेच शिंदेंचं मन मात्र खात होतं, शिंदेंच्या आजूबाजूला बसलेले चमचे. इतक्या वेळा लोकांना सांगूनही पटत नसेल तर ते आणखी स्पष्टीकरण देत होते. शिंदेंचं कालचं भाषणही तोच तो खुळा प्रयत्न होता.  पण काल भर पावसामध्ये लोकांनी जीवाचे कान करून भाषण ऐकलं एकही माणूस उठला नाही. निष्ठावंतांचा मेळावा काय असतो आणि गद्दारांचा इव्हेंट काय असतो हे अधोरेखित करणारं होतंअशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. गद्दारांच्या इव्हेंटला भाडोत्री गर्दी जमली होती. अक्षरक्ष: शिंदे यांचे भाषण सुरू असताना, भाडोत्री लोक रोजंदारी सारखी आलेली. उठून जात होती, तेव्हा ह्यांना गेट बंद करावं लागलं. त्यांनी फार नाकाने वांगी सोलू नये”  असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

अशा चिल्लर आणि अशा लोकांचे प्रश्न नका विचारू सुषमा अंधारे यांनी ज्योती वाघमारे यांच्यावरती बोलणं टाळलं. कदमांच कोकणातलं अस्तित्व नामशेष होत चाललय. कदमांच्या पोरानं कदमाची सर्व घालवली. आईच्या नावे डान्सबार सुरू केलाय. सतत टक्केवारीचा राजकारण. कोकणात मी सुद्धा आहे हे आटापिटा करण्याच्या नादात कदमांच ते स्टेटमेंट आलंअसं सुषमा अंधारे म्हणाल्या.

इतके दिवस ते का गप्प होते?

कदम यांना हे आधी कळत नव्हतं का? इतके दिवस ते का गप्प होते? मंत्रीपद का भोगली? कदम आणि आपल्या पोराची तिकीट मागण्याची लाचारी का केली? कदम यांचा खरेपणा इतके दिवस कुठे गेला होता?. उदय सामंत यांच्यापेक्षा मी तुमच्या पेक्षा कसा जास्त वफादार आहे. हे त्यांना दाखवून द्यायचं होतं अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

विनाकारण शब्द फुकू नये

किती विरोधाभास आहे हेच म्हणतात की असे भाऊ एकत्रित आले तरी आम्हाला फरक नाही पडत, मग बोलतात कशाला? थुंकून चाटायची जी सवय आहे, ती गद्दारांसोबत गेलेल्या भाटांना आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केलीशेकडो कोटी रुपये कमवल्यानंतर सुद्धा आपल्या भावाच्या विधवेला वीस कोटी रुपये देणं होत नाही. भिकार मानसिकता असणाऱ्या फुके यांनी असे विनाकारण शब्द फुकू नयेअशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.