AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यांना विधान परिषदेची आमदारकी देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आली, त्यानंतर आता बच्चू कडू यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 4:09 PM
Share

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला आहे.  मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान या पक्षप्रवेशावेळी आमदार  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती.

बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. परंतु बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे कार्यकर्ते नाराज आहेत, मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर आज हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे.  आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता.  ‘घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,  कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार होते, मात्र तरी देखील त्यांना महाविकास आघाडीकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर  बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ