तेव्हा कोणत्या टोपीखाली हिंदुत्व जातं? उद्धव ठाकरेंचा केंद्राला सवाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी वंदेभारतवर संसदेत चर्चा घडवण्याच्या विषयावरुनही भाजपाला घेरले आहे.

केंद्र सरकारने वंदेभारत गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसेदत चर्चा घडवली आहे. या वंदेभारतवरुन आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. अमित शहा यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये आणि त्यांच्या भाजपाने आणि संघाने देखील या फंद्यात पडू नये असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. त्यांनी अमित शाह आणि त्यांचे पूत्र जय शहा यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की अमित शाह यांनी मला हिंदुत्व शिकवू नये. आता त्यांच्या आणखी काही गोष्टी बाहेर पडत आहेत. जीनांच्या थडग्यावर कोणी माथा टेकवला इथपासून ते बऱ्याच आहेत. नवाज शरीफांचा केक कोणी खाल्ला होता इथपासून बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबरोबर यांचा मुलगा क्रिकेट खेळत आहे. तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जातं. कोणत्या टोपी खाली दडतं असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की जय शाह त्यांचं ऐकत नसेल तर मी हिंदुत्ववादी आहे, जय शाह हिंदुत्ववादी नाही असं अमित शाह यांनी सांगावं. तो पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय. त्याला क्रिकेट बोर्डाचा राजीनामा तरी द्यायला लावा. नाही तर हिंदुत्व तरी स्वीकारायला लावा अशी मागणीच ठाकरे यांनी यावेळी केली.
शामाप्रसाद मुखर्जी यांचे मुस्लीम लीग बरोबर कसे साटेलोटे होते. त्यांनी बंगालच्या चळवळीत ‘चले जाव’ला कसा विरोध केला होता. फझरुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये यांचे देव शामाप्रसाद मुखर्जी देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते. हे आता सगळे आलेले. तीन ठिकाणी यांचे मुस्लीम लीग सोबत सरकार होते असा आरोप उध्दव ठाकरे यांनी यावेळी केला. आणि हे यांचे राजकारणात जन्मदाते त्यांच्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचे.त्यामुळे अमित शाह यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या फंद्यात बिलकुल पडू नये असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
