भाजपचं वंदेमातरम हे फक्त वन डे मातरम… उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
लोकसभेत केंद्र सरकारने वंदेभारतला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत चर्चा घडवून आणली आहे. त्यावरुन आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.

भाजपाने वंदेमातरमवर संसदेत चर्चा घडवून आणली आहे. त्यांच्या चर्चेवर शिवसेना नेने उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली आहे. भाजपाने आपल्याला हिंदुत्व शिकवण्याच्या फंद्यात पडू नये. त्यांना वंदेभारत आता आठवले आहे. एखाद्या देशात राष्ट्रगीतावर चर्चा कशी काय होऊ शकते ? इतक्या वर्षात भाजपला का आठवले नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पत्रकार परिषदेत केला आहे.
उद्वव ठाकरे यावेळी म्हणाले की अमित शाह यांच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची काही गरज नाही. भाजपनेही नाही आणि संघाने तर अजिबात नाही. तुर्त काय झालंय की, गेले दोन तीन दिवस संसदेच्या अधिवेशनात वंदेमातरमावर चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की एखाद्या देशात राष्ट्रगीतावर बहस कशी काय होऊ शकते. इतक्या वर्षात भाजपला का आठवलं नाही. दीडशे वर्ष झाली. भाजपचं वंदेमातरम हे फक्त वन डे मातरम आहे. एका दिवसाचं आहे. बाकीच्यावेळी त्यांना पडलेलं नाही. भारतात काय चाललंय माझी माता किती दुखात आहे. याचं त्यांना काही पडलं नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे
उद्धव ठाकरे यांनी टीका करताना म्हणाले की यांच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. मी गोमांस खातो. कोण मला अडवतो बघतो असेही ते म्हणतात. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे, ९ डिसेंबरचा. त्या मंत्र्याचे नाव किरण रिजिजू आहे. त्यांच्यासोबत शाह जेवत आहेत. त्यांच्या आणि यांच्या थाळीत काय असेल माहीत नाही ? अमित शाह यांना माझ्या हिंदुत्वावर शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजीजू यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. कारण ते गोमांस खातात त्यांनीच सांगितले आहे.
