AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्रू पुसले, हात हातात घेतला अन्… शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी केली एकच विनंती

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त क्षेत्रांचा दौरा केला आणि शेतकऱ्यांना धीर दिला. त्यांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे म्हटले आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी पुढे रेटली.

अश्रू पुसले, हात हातात घेतला अन्... शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी केली एकच विनंती
| Updated on: Sep 25, 2025 | 1:14 PM
Share

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता सध्या अनेक सत्ताधारी हे या नुकसानीची पाहणी करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्यासोबत संवाद साधला. “माझ्या हातात काही नसले तरी, तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे. कोणीही खचू नका आणि वेडवाकडं पाऊल उचलू नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. त्यामुळे ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. उद्धव ठाकरे हे मराठवाड्यात दाखल होताच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे व्यथा माडंल्या. मराठवाड्यात पहिल्यांदा उलट झालंय. पाणीच पाणी झालंय. यातून आपल्याला बाहेर पडायला हवं. तुमची मागणी जी आहे कर्जमाफीची ती आहेच. मला त्यात पडायचं नाही. नाहीतर पुन्हा लोक म्हणतील मी राजकारण करतो. आता हे संकट उलट आलं आहे. इतक्या वर्षात असं काही झालेलं मला तरी आठवत नाही. सरकारने जाहीर केलेली मदत २०२३ च्या निकषांनुसार असून, ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ

यावेळी एका शेतकऱ्याने आम्हाला फक्त साधारण ८००० रुपये मदत मिळेल,” असे सांगितल्यावर, आणखी एका शेतकऱ्याने काढणीसाठीच ६००० रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. यावर उद्धव ठाकरेंनी म्हणजे जी मदत येणार ती अशीच जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एका शेतकऱ्याने आपले दोन-तीन लाखांचे कर्ज, २० लोकांचे कुटुंब आणि सरकारी नोकरी नसताना मराठा आरक्षणही मिळत नसल्याची व्यथा मांडली. यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धीर दिला. “तुमचा हात हातात धरणं, एवढंच सध्या आम्ही करू शकतो. पण आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवून हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी भगवान अंकुश म्हस्के या शेतकऱ्याने “जेवायला परवडत नाही, एकरी ५० हजार देऊनही परवडत नाही,” अशी व्यथा मांडून आपले दुःख व्यक्त केले. त्यावर, उद्धव ठाकरे यांनी हात जोडून शेतकऱ्याला खचून न जाण्याची विनंती केली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!