उज्ज्वल निकम यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन् मी मंत्री झालो… गुलाबराव पाटील यांनी सांगितलेला किस्सा काय?
ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे.

ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवड झाली आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उज्ज्वल निकम पहिल्यांदाच जळगाव मध्ये आले होते. आज सकाळी रेल्वेस्थानकावर निकम यांचे जंगी स्वागत करण्यात आले, शहरातून रॅलीही काढण्यात आली. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री गुराबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी निकम यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
गुलाबराव पाटील यांनी सांगितला किस्सा
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना एक किस्सा सांगितला. पाटील म्हणाले की, ‘आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस आहे. उज्ज्वल निकम यांनी देशात नाव उज्वल केलं आहे. पालकमंत्री म्हणून मी निकम साहेबांचं स्वागत करतो. निकम साहेबांनी उध्दव ठाकरेंना फोन केला आणि मी मंत्री झालो. विधी आणि न्यायाच्या बाबतीत जेव्हा अडचण येते तेंव्हा उज्ज्वल निकम असतात. आता दिल्लीच्या तख्तावर उज्ज्वल निकम नाव उज्ज्वल करतील.’
गिरीश महाजननांकडून कौतुक
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही उज्ज्वल निकम यांचे कौतुक केले. महाजन म्हणाले की, ‘आज सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. आमचे मित्र आणि जळगावचे सुपुत्र उज्ज्वल निकम यांचा आपण सन्मान करत आहोत. गेल्या वेळीच त्यांना जळगावमधून लोकसभेच तिकीट दिले जाणार होते, मात्र त्यांना मुंबई मधून तिकीट देण्यात आले. अगदी थोड्या मनातनी निकम यांचा पराभव झाला.’
महाजन पुढे म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्ष हा जोहऱ्यांचा पक्ष आहे त्यांना हिऱ्याची पारख आहे. निकम साहेबांचं नाव राज्यसभेवर ही सोपी गोष्ट नाही . आम्हाला कुणालाही कल्पना नव्हती, मात्र उज्ज्वल निकम यांची अचानक राज्यसेभवर निवड झाली. आम्ही पुढारी मंत्री आहोत. आमच्या मागे कमी आणि लोक त्यांच्या सोबत फोटो घेतात.’
पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी निकम यांनी मंत्रिपद देण्याबाबत संकेत दिले आहेत. ‘उज्ज्वल निकम आता मोदी अमित शाह यांच्या सोबत बसणार आहेत. उज्ज्वल निकम एका चांगल्या पक्षाचे खासदार झाले आहेत. त्यांचे योग चांगले आहेत. फक्त खासदार म्हणून तुम्हाला घेतलं नसेल’ असं म्हणत महाजन यांनी मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत.
