AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने किडनी दिली, पण फॅमिली डॉक्टरने केलं असं काही… उल्हासनगरात भयंकर कांड समोर

उल्हासनगरमध्ये फॅमिली डॉक्टरनेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एका महिलेची ३१ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंतरराज्यीय किडनी रॅकेट चालवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने किडनी दिली, पण फॅमिली डॉक्टरने केलं असं काही... उल्हासनगरात भयंकर कांड समोर
ulhasnagar
| Updated on: May 07, 2026 | 11:08 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने माणुसकीला काळिमा फासणाऱ्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एक खळबळजनक घटन उघडकीस आली आहे. आजारपणात आधार देण्याऐवजी, चक्क एका फॅमिली डॉक्टरनेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान करणारी पत्नी किडनी रॅकेटच्या जाळ्यात अडकली. त्यामुळे तिला तब्बल ३१ लाखांचा गंडा घालण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

उल्हासनगरमधील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दिपाली चव्हाण यांचा पती गंभीर आजाराने त्रस्त होता. पतीचा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःची किडनी दान केली होती. मात्र, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पतीला इन्फेक्शन झाले आणि त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाचे विश्वासू डॉक्टर गौरव धर्मा नायर यांनी मदतीचे आश्वासन दिले.

डॉ. नायर यांनी दिपाली यांना सांगितले की, ते त्यांच्या पतीसाठी दुसऱ्या किडनी दात्याची व्यवस्था करतील. तसेच शस्त्रक्रिया यशस्वी करून देतील. या कामासाठी त्यांनी दिपाली यांची ओळख मोसामी बिस्वास, जयदेव बिस्वास आणि इतर काही लोकांशी करून दिली.

यानतंर २ जुलै २०२५ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत नवीन किडनी दाता मिळवून देणे आणि पुढील उपचारांच्या नावाखाली आरोपींनी दिपाली चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. यानंतर रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ३१ लाख ६७ हजार ८६० रुपये घेण्यात आले. मात्र, एवढी मोठी रक्कम देऊनही त्यांना कोणताही किडनी दाता मिळाला नाही. तसेच त्यांच्या पतीवर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही. ही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिपाली यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

मोठे आंतरराज्यीय किडनी रॅकेट कार्यरत

या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या फसवणुकीचे धागेदोरे थेट ओडिशातील भुवनेश्वरपर्यंत पोहोचले आहेत. या व्यवहारातील काही आर्थिक व्यवहार भुवनेश्वरमधील एका प्रसिद्ध रुग्णालयाशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे हे केवळ साधे फसवणुकीचे प्रकरण नसून यामागे मोठे आंतरराज्यीय किडनी रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

डीसीपी सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी पोलिसांनी फॅमिली डॉक्टरसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी डॉक्टर अजूनही उघडपणे आपल्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि पीडित कुटुंबात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.